आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भडक नेल पेंट्सने घातली तरुणाईला भुरळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ब्रँडेड नेल पेंट्स कंपन्यांनी यंगस्टर्सपासून फोर्टी प्लसपर्यंतच्या महिलांसाठी उन्हाळ्यात भडक रंगांची मालिका लाँच केली आहे.


जर तुम्ही अनेक वर्षांपासून एकाच प्रकारच्या शेड्सचे नेल पेंट्स लावून कंटाळला असाल तर मग काही तरी प्रयोगशील करण्याची वेळ आली आहे. ब्रँडेड नेल पेंट्स कंपन्यांनी यंगस्टर्सपासून चाळिशी ओलांडलेल्या महिलांपर्यंत भडक रंगांची मालिका लाँच केली आहे. तसे पाहिले तर लोकल पेंट्सही बाजारात आहेत; परंतु ब्रँडेड कलर्सची शाइन आणि क्वालिटी त्यांना अधिक खुलवते. रॉकिंग ब्लॅक, चेंजिंग मूड ऑरेंज, मोरपंखी ग्रीन, पर्पल, ब्लू आणि ग्रीनसारखे रंग आता बोटांचे सौंदर्य वाढवत आहेत. लॅक्मे, कलरबार, एल 18 सारख्या अनेक कंपन्यांनी या रंगांची मालिका सादर
केली आहे.


तरुणाईने या रंगांना आपला मूड इंडिकेटर बनवले आहे. जर रात्रीच्या पार्टीला जायचे असल्यास ब्लॅक ड्रेसवर ब्लॅक रंगांची नेल पेंट लावण्यात येते. ब्लॅक रंग हा रॉकिंग आणि मस्ती दर्शविणारा असतो. तसेच ऑरेंज आणि सी ग्रीन तरुणाईचा आनंद आणि उत्साह दर्शविणारा रंग असल्याचे मानले जाते.


मम्मीवाले कलर्स नको
एम.जे. कॉलेजची विद्यार्थिनी हर्षा वर्मा म्हणते की, पहिले जे कलर्स माझी आई लावायची तेच कलर्स आम्हाला लावावे लागायचे; परंतु दोघांसाठी वेगवेगळे रंग का असू शकत नाही, याचा कधी विचारच केला गेला नाही; परंतु आता ते कंटाळवाणे असणारे मरून, पिंक यासारख्या मिळत्याजुळत्या कलर्सपासून आम्ही दूर राहणेच पसंत केलेले आहे. जर स्काय ब्लू रंगाचा टी-शर्ट घातला त्यावर पिकॉक ग्रीन अधिक खुलून दिसतो. गरज नाही की, एकाच प्रकारची शेड लावावी. वेगवेगळे कलर्स पाचही बोटांना लावू शकतो. सध्या प्रत्येक तरुणी किंवा महिला ही भडक रंगांच्या प्रेमात पडली आहे. प्रत्येकीला ऑरेंज, लाइट ग्रीन, रेड तसेच ब्लॅक, व्हाइट रंग आवडतात. तसेच नुसते प्लेन रंग न लावता त्यावर डिझाइन करून ते वापरण्यावर त्यांचा अधिक भर आहे.
प्रतिभा शिरसाठ, ब्युटिशियन, ट्विंकल ब्युटी पार्लर