आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायबर गुन्ह्यांमध्ये अडकतेय आजची तरुणाई : कुलकर्णी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पाेलिस विभागासमाेर इतर गुन्हेगारी साेबतच सध्या सर्वत्र वाढत असलेली सायबर गुन्हेगारीही माेठी डाेकेदुखी ठरत अाहे. सायबर गुन्हेगारीत १८ ते ३० वयाेगटातील गुन्हेगारांची संख्या जास्त असल्याची माहिती सायबर क्राइमतज्ज्ञ परीक्षित कुलकर्णी यांनी दिली.
सायबर गुन्हेगारीविषयी पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यशाळा पाेलिस मुख्यालयातील मंगलम सभागृहात मंगळवारी सकाळी ११ वाजता झाली. या वेळी कुलकर्णी बाेलत हाेते. कार्यशाळेला पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक प्रभाकर रायते, जिल्ह्यातील ३५ पाेलिस ठाण्यांमधून अालेले ३५६ अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाेते. दुसऱ्या सत्रात सरकारी अभियाेक्ता अॅड. गाेपाळ जळमकर यांनी सायबर कायद्यांविषयी मार्गदर्शन केले.
पायरसीचेप्रकार वाढले
पायरसीच्याप्रकारात माेठ्या प्रमाणात वाढ झाली अाहे. यात काॅपीराइट अॅक्ट प्रमाणे तसेच अायटी अॅक्ट २००० अाणि ६३ प्रमाणे कारवाई हाेऊ शकते.
गुन्हेगारांसाेबतपाेलिस खात्यानेही अपडेट व्हावे : डाॅ.सुपेकर
पूर्वीयुद्ध हे समाेरासमाेर हाेत हाेते. मात्र, सध्या जगाच्या काेणत्याही काेपऱ्यात बसून नियाेजन करून हल्ला हाेत अाहे. त्यामुळे गुन्हेगार जेवढे अद्ययावत पद्धतीने गुन्हे, हल्ले करतात. त्याच्या पुढे जाऊन पाेलिस खात्याने कारवाई करण्याची गरज येऊन ठेपली अाहे. सायबर गुन्हे उघडकीस अाणण्यासाेबतच सायबरची सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची अाहे. गुन्ह्यांमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा उपयाेग केला जाताे. त्यामुळे ते गुन्हे उघडकीस अाणण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान अवगत असलेले कर्मचारीही असणे गरजेचे अाहे. चांगले प्रयत्न केले तर सर्व गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे िजल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर यांनी सांिगतले.

पंचनामाकरताना वेळ, तारीख महत्त्वाची : अॅड.जळमकर
पाेलिसकर्मचाऱ्यांनी काेणत्याही घटनेचा पंचनामा करताना वेळ तारीख टाकणे महत्त्वाचे अाहे. मात्र, अनेक घटनांमध्ये असा उल्लेख केला जात नसल्याची खंत शासकीय अभियाेक्ता अॅड.गाेपाळ जळमकर यांनी व्यक्त केली. वैद्यकीय अधिकाऱ्याचे पत्र मागावे. तसेच अभिप्राय घेण्यासाठी अधिकाऱ्याने स्वत: जाणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांिगतले.

व्यसनांचेजवळचे नाते : डाॅ.जाेशी
व्यसनेअाणि पाेलिसांचा फार जवळचा संबंध असल्याचे मानसाेपचारतज्ज्ञ डाॅ.प्रदीप जाेशी यांनी पाेलिसांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सांगितले. कारण पाेलिसांचा व्यसनाधीन लाेकांशी कायम संबंध येताे. दारूमुळे सद्सद्विवेकबुद्धी भ्रष्ट हाेते. त्यामुळे पाेलिसांनी व्यसनांपासून दूर राहावे, असा सल्ला डाॅ.जाेशी यांनी दिला.

जिल्हा पाेलिस मुख्यालयातील मंगलम सभागृहात मंगळवारी सायबर गुन्हेगारीविषयी कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला उपस्थित असलेले जिल्ह्यातील िवविध पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कर्मचारी.

एसपी उठताच अधिकारी बाहेर
सायबरक्राइम विषयी घेतलेल्या कार्यशाळेस मंगळवारी जिल्हाभरातून अधिकारी, कर्मचारी अालेले हाेते. मात्र, कार्यशाळेचे उद्‌्घाटन झाल्यानंतर जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. सुपेकर पुढील बैठकीसाठी निघून गेले. ते कार्यक्रमातून उठल्यानंतर पुढच्या भागात बसलेले पाेलिस उपनिरीक्षक उठून बाहेर अाले. कार्यशाळा साेडून बाहेर गप्पा मारण्यात त्यांनी वेळ घालवला. पाेलिस अधीक्षकांनी सायबर क्राइम विषयी माहिती मिळावी म्हणून कार्यशाळा अायाेजित केली हाेती. मात्र, त्याचे गांभीर्य काही अधिकाऱ्यांना वाटत नसल्याचे िचत्र हाेते.
व्हायरसपासून बचाव करा
सध्यावाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांमुळे त्या विषयीचे कायदे, बचाव अाणि उपाय याविषयी माहिती असणे गरजेेचे झाले अाहे. साडेतीन मिनिटांत वेबसाइट, ई-मेल हॅक करता येतात. त्यामुळे सर्वांनी दक्ष राहण्याची गरज अाहे. व्हायरस टाकून डाटा उडवण्याचे प्रकार तसेच फिशिंग करून बंॅकेतून, एटीएममधून पासवर्ड विचारून पैसे परस्पर काढणे, बक्षीस लागल्याचे अामिष दाखवून लुबाडण्याचे गुन्हे नित्याचेच झाले अाहेत. त्यामुळे अापल्या संगणकामध्ये व्हायरस जायला नकाे म्हणून सर्वाेत्तम अॅण्टी वायरस असलेले बीट िडफेंडर हे टाकून घेण्याचा सल्ला कुलकर्णीं यांनी दिला.