आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादावाडीजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दादावाडीजवळ बुधवारी दुपारी १२.३० वाजता ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील युवक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी तालुका पाेलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. हर्षल गणेश भावसार (वय २१, रा. बीबानगर) हा बुधवारी दुपारी १२.३० वाजता बांभाेरीकडून दुचाकी (क्रमांक एमएच- १९, बीएस- ०९७५)ने शहराकडे येत हाेता. दादावाडीजवळील महेश सिरॅमिकसमाेर एका ट्रॅक्टरला अाेव्हरटेक करताना समाेरून ट्रक अाला; मात्र तरीही ट्रॅक्टरचालकाने वेग कमी केला नाही. त्यामुळे हर्षल ट्रॅक्टरवर धडकला. त्यात त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. घटना घडल्यानंतर चालक ट्रॅक्टर घेऊन फरार झाला. दादावाडीसमाेरील रिक्षाचालकांनी हर्षलला जिल्हा रग्णालयामध्ये दाखल केले. पण त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात हलवण्यात अाले. हर्षल हा स्वत: रिक्षा चालविताे. तसेच त्याचे वडील गणेश भावसार हे रिक्षाचालक तसेच ते जैन इंरिगेशनमध्ये नाेकरी करतात. ताे त्याच्या मित्राची माेटारसायकल घेऊन शहरात येत असल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...