आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देव तारी त्याला काेण मारी:रेल्वेखाली पडूनही तरुण बचावला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र.तीनवर रेल्वेखाली पडलेला तरुण.
जळगाव - जळगाव रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म तीनवर देवळाली-भुसावळ शटल ही गाडी पकडण्याच्या प्रयत्नात एक युवक खाली पडला. अंगावर चार डब्बे जाऊनही तो सुखरूप बचावला. अंगावर शहारे आणणारी ही चित्तथरारक घटना सोमवारी सकाळी १० वाजता घटना घडली. या प्रकारावरून ‘देवतारी त्यास कोण मारी’ याची प्रचिती उपस्थितांना आल्यावाचून राहिली नसेल.
रेल्वेस्थानकावर देवळाली-भुसावळ शटल प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर सकाळी १० वाजता थांबली. गाडीला अप-डाऊन करणाऱ्या चाकरमान्यांसह प्रवाशांची मोठ्याप्रमाणावर गर्दी होती.
चढणाऱ्या आणि उतरणाऱ्यांची धावपळ सुरू होती. त्यात गाडी सुरू झाल्यावर कपिल प्रेमलाल कासजे (वय २५) हा युवक गाडी पकडण्यासाठी धावत होता. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका महिला पुरुषाशी त्याची धडक झाली. त्यात तो रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या गॅपमध्ये पडला. शौचालयाचा पाइप त्याच्या कमरेला लागल्याने तो एकदम फिरला आणि दोन डब्यांच्या मध्यभागी सरकला. गाडीत बसलेल्या आशिष नावाच्या प्रवाशाने समयसूचकता दाखवून रेल्वेची साखळी ओढली. तोपर्यंत त्याच्या अंगावरून चार डबे गेलेले होते. लहान दादऱ्याजवळ गेल्यावर गाडी थांबली. स्थानकावर धावपळ उडाली. तरुण गाडीखाली सापडला; त्याचा मृत्यू झाला असेल, असेच सगळ्यांना वाटायला लागले. मात्र, कपिल गाडी खालून बाहेर येऊन चालत प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर येऊन बसला. त्याला किरकोळ दुखापतीं व्यतििरक्त तो एकदम ठणठणीत होता. हा प्रकार पाहून स्थानकावर उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर रेल्वे पाेिलसांनी त्याला तत्काळ रुग्णवािहका बोलवून सिव्हीलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

मालधक्क्यावर करतो हमाली
कपिलकासजे हा मूळचा मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील गोमुख येथील रहिवासी आहे. तो कामानिमित्त एक महिन्यापूर्वी जळगावला आला होता. मालधक्क्यावर हमालीचे काम करीत होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने मिळेल ते काम कपिल करीत होता. वडील वारलेले आहेत. घरची जबाबदारी मोठा भाऊ केशव आणि कपिलवर आहे. केशव खंडव्याला मजुरीचे काम करतो. गेल्या चार दिवसांपासून कपिलची प्रकृती ठीक नसल्याने भावाने त्याला घरी निघून येण्यासाठी सांगितले. सोमवारी घरी जात असताना रेल्वेस्थानकावर हा अपघात घडला. यात कपिलच्या पाठीला, खांद्याला जखमा झाल्या.

पुढे पाहा घटनाक्रम..