आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहा वाटणाऱ्या तरुणाकडून फुले मार्केटची सफाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा मिळालेल्या सेंट्रल फुले मार्केटमधील चहा विक्रेता मनोज गवळी या तरूणाने बुधवारी संपूर्ण परिसर स्वच्छ केला. आपल्या या उपक्रमात अन्य दुकानदारांनीही हातभार लावल्यास स्वच्छ भारत अभियानाला बळकटी मिळेल असा विश्वास मनोजने ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केला.

दीड वर्षापासून नारायण गवळी यांच्या नारायण टी सेंटर येथे मनोज गवळी (वय २८) हा चहा वाटपाचे काम करतो. गेल्या दोन वर्षांपासून पालिकेने मार्केटमधील साफसफाईचा ठेका रद्द केला आहे. त्यामुळे दुकानदारांना स्वच्छतेसाठी खाजगी कामगाराला ३० रुपये महिना खर्च करावा लागत आहे. हे कामगारही नियमित येत नसल्याने मार्केटमध्ये प्रचंड घाण झालेली आहे. ज्या ठिकाणी आपण रोजी रोटी कमावतो, त्याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य असल्याचे पाहावत नसल्याने मालक गवळींची परवानगी घेऊन मनोजने बुधवारी दुपारी तिसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृह, पॅसेज, जिना साफ करून कचरा एकत्र केला. हा उपक्रम पाहून अन्य दुकानदारांनीही यात सहभागी होण्याचा मानस व्यक्त केला.

इतर व्यापारी करणार स्वच्छता
मनोजचे कार्य पाहून इतर दुकानदारांनी ही मार्केट स्वच्छ ठेवण्याचा केला निश्चय; उपक्रमाची इतरांनीही प्रेरणा घेण्याची गरज आहे. मनोज सोनार या व्यापाऱ्यानेही स्वच्छतेची मोहीम सुरूच ठेवून मनोजला सहकार्य करणार असल्याचे सांगितले. जितू यादव या तरुणानेदेखील दररोज स्वच्छता करण्याची घोषणा केली. त्यामुळे मनोजने केले कार्य खऱ्या अर्थाने सार्थकी लागले आहे.

‘प्रत्येक दिवस स्वच्छतेचा’ दिव्य मराठी’ची मोहीम
स्वच्छताअभियानात आपलाही खारीचा वाटा असावा असे प्रत्येकाला वाटते.परंतु नेमके सुरुवात कशी आणि कुठून करायची असाही प्रश्न पडतो.चांगल्या कामाची सुरुवात आपल्या घरापासून करावी अशी म्हण आहे.त्याच धर्तीवर स्वच्छता अभियानाची सुरुवात आपण आपल्या परिसरापासून करु या. तुम्ही एवढेच करा आपल्या परिसरात, गल्लीत, कॉलनीत कचरा असल्यास त्याचा फोटो आमच्याकडे पाठवा.आम्ही तो फोटो आपल्या भागातील लोकप्रतिनिधीकडे पाठवू.त्यांनी परिसर स्वच्छ केल्यास त्याला प्रसिध्दी देऊ. किंवा आपण पुढाकार घेऊन आपल्या भागात स्वच्छता अभियान राबवल्यास आम्ही त्यालाही ठळक प्रसिध्दी देऊ.स्व्वच्छतेचे फोटो dmjalswachha@gmail.com या ई-मेल आयडीवर किंवा ७५८८८१३०८२आणि७८७५७१७८८१यामोबाइल क्रमांकावर व्‍हॉट‌्सअॅपने पाठवू शकता. फोटोखाली आपला परिसर आणि नगरसेवकाचे नाव, मंडळ, सोसायटी, आस्थापना, ग्रुपचे नाव नमूद करावे. टीप - मोबाइलने काढलेले फोटो शक्यतो पाठवू नयेत. कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोंना प्राधान्य देण्यात येईल.