आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसातून 2 तास स्वच्छतेसाठी देण्याची युवकांनी घेतली शपथ, 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- भारत सरकारच्या युवा क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र (जळगाव) मार्फत ते १५ अाॅगस्टदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात ‘स्वच्छता पंधरवडा’ उपक्रम राबवण्यात येत आहे. यानिमित्त प्रत्येकाने स्वच्छतेच्या कार्यात सहभागी व्हावे, यासाठी विविध माध्यमातून युवकांतर्फे जनजागृती करण्यात येणार अाहे. या उपक्रमाची सुरुवात गुरुवारी शपथ घेऊन करण्यात अाली.
 
नवी दिल्ली येथील नेहरू युवा केंद्राचे मेजर दिलवरसिंग यांच्या निर्देशानुसार सर्व जिल्हाभरात वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ युवक युवतींना शपथ देऊन करण्यात आला. वर्षातून १०० दिवस दिवसातून तास असे नियोजन करून गाव, शहर, गल्ली इतर भागात स्वच्छता मोहीम राबवून इतरांना सामावून घेण्याची शपथ या वेळी युवकांना देण्यात अाली. या वेळी ३० स्वयंसेवकांना जिल्हा युवा समन्वयक अतुल निकम यांनी शपथ दिली. या उपक्रमात सायकल फेरी, प्रभात फेरी, प्रश्नाेत्तरे, वक्तृत्व स्पर्धा, भाषणे अादी कार्यक्रमांचे ग्रामीण भागात अायाेजन करण्यात येणार अाहे. तसेच शहरात बसस्थानक, रेल्वेस्टेशन परिसर इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या वेळी दिशा बहुद्देशीय संस्थेचे विनोद ढगे, लेखपाल सुनील पंजे, स्वयंसेवक राकेश वाणी, अमोल भालेराव, सत्येन्द्रराज बिऱ्हाडे, गणेश सोनवणे, धनश्री मिस्त्री, कविता सुरवाडे, राजरत्न हिरवाले आदी उपस्थित होते.
 
जळगाव भारत पेट्रोलियम कार्पोरेशन अंतर्गत रेखा गॅस एजन्सीतर्फे गिरिजाबाई नथू चांदसर बालमोहन विद्यालय, पिंप्राळ्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात तक्रार निवारण अधिकारी ज्योत्स्ना भारंबे यांच्यासह सर्व वितरण कर्मचाऱ्यांनी शालेय परिसरात साफसफाई करून कचरा व्हॅनमध्ये टाकून तो कचरा महापालिकेच्या कचरा यार्डमध्ये टाकण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपक्रमास दीपक पाटील, विलास वाणी, प्रदीप पाटील आदींनी सहकार्य केले.
 
‘मी स्वत: स्वच्छ राहिन...’
भारतहा तरुणांचा हा देश असून प्रत्येक युवकाने स्वच्छतेच्या या कामात अापला हातभार लावावा. स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ जळगाव जिल्हा अाणि अापला देश स्वच्छ करण्यासाठी युवकांनी सहभागी व्हावे, असे अतुल निकम यांनी सांगितले. तसेच ‘मी स्वत: स्वच्छ राहिन, अाजुबाजूचा परिसर स्वच्छ करेन इतरांनाही या साठी प्राेत्साहित करेल’ या अाशयाची शपथ निकम यांनी युवकांना दिली.
बातम्या आणखी आहेत...