आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकांनी राजकारणात येऊन तुरटीसारखे काम करायला हवे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सद्य:स्थितीत प्रशिक्षित, कर्तव्यनिष्ठ, तपस्वी युवकांनी राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन अधिकाधिक संख्येने राजकारणात येण्याची गरज अाहे. त्यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंद, डॉ.आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. समाजाची सुख-दु:खे जाणून वेगवेगळ्या समाजोपयोगी प्रयत्नांमध्ये ताऊन-सुलाखून राजकारणातील गढूळतेत तुरटीसारखे काम करावे, असे आवाहन युवा राजकीय विश्लेषक तथा एमआयटीतील सहायक प्रा.मनीष केळकर यांनी राष्ट्रीय युवा दिनाच्या पूर्वसंधेला ‘दिव्य मराठी’च्या माध्यमातून युवकांना केले.
>समाजकारणाकडे काही लोक करिअर म्हणून बघू लागले आहेत का?
समाजकारणातकरिअरची व्याख्या 'नफा कमवणे' असेल तर ते अडचणीचे ठरू शकते. नफेखोरीला विरोधच व्हायला हवा. वैयक्तिक अधिष्ठान पक्के हवे. त्यावरून घसरून चालणार नाही. समाजकारणात व्यक्ती निर्माणाचे काम व्हावे. त्यासाठी चरित्र निर्माण होणे आवश्यक आहे. या गोष्टीचाही विचार करणे गरजेचे आहे.
> राजकारणात घराणेशाही प्रचलित होत चालली आहे का?
राजकारणाबरोबरवैद्यकीय, समाजकारण, शिक्षण, उद्योग या सर्वच क्षेत्रांत घराणेशाही प्रचलित आहे. त्याला पूर्ण विरोध होण्याचे कारण नाही. इलेक्टिव्ह मेरिटवर काम नको. घराणेशाहीतील सर्वच वाईट आहेत, असेही नाही. तळागाळातून आलेल्या सर्वांवरच चांगुलपणाचा ठप्पा मारता येणार नाही. लोकशाहीला बायपास असता कामा नये. घराणेशाहीचे तोटे होऊ नयेत, म्हणून समाज प्रबोधन व्हायला हवे, नाहीतर त्याची लोकशाहीला किंमत मोजावी लागेल. संकरित गुणधर्माचा फायदाही होतो. "मागच्यास ठेच पुढचा शहाणा', असेही होते. घराणेशाहीत अपयशी झालेल्यांची संख्याही मोठी आहे.
>शेतकऱ्यांच्या मुलांना शेती करावीशी वाटत नाही तर उद्योगात गुंतवणूक करून विकतचा मन:स्ताप कशाला घ्यायचा, अशी मानसिकता समाजात आहे?
कोणत्याहीक्षेत्रातून पूर्णपणे पलायन करणे राष्ट्रहिताचे नाही. धोकादायक क्षेत्राला मदत करण्याची जबाबदारी सरकार आर्थिक सधन क्षेत्रांची आहे, त्यांनी ती उचलावी. सरकारच्या "जलयुक्त शिवार' अभियानामुळे आगामी काळात शेती क्षेत्रात सुगीचे दिवस येण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. शिक्षण क्षेत्रात पुरवठा वाढला पाहिजे. उत्तम सरकारी सुविधांचा दर्जा गुणवत्तेत वाढ झाली पाहिजे. सरकार संचलित संस्थांच्या डॉक्टर्स, अभियांत्रिकी इतर अभ्यासक्रमांच्या जागा लोकसंख्येच्या प्रमाणात वाढल्या पाहिजेत. कालसुसंगत शिक्षण देण्यासाठी १०-२० वर्षांऐवजी दर तीन वर्षांनी अभ्यासक्रम बदलायला हवा. हे अभ्यासक्रम राबवत असताना उद्योजक, व्यावसायिकांना सल्लागार म्हणून घ्यावे. सोशल मीडिया गतिमान आहे. कालचे खरे ते आज कालबाह्य आहे. सर्व काही तत्काळ हवे आहे. युवकांच्या गरजा पुरवू शकलो नाही, तर बालंट ओढवेल.
>वर्षपूर्तीकडे विश्लेषकाच्या नजरेतून कसे बघता?
सरकारचीकामगिरी समाधानकारक आहे. उद्योगपती उच्चवर्गीयांचे सरकार म्हणून भाजप-सेना सरकारवर शिक्का मारणे, योग्य होणार नाही. सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात सबसिडी जमा करायला सुरुवात केली आहे. जलयुक्तच्या माध्यमातून २४ टीएमसी पाण्याची अतिरिक्त सोय झाली आहे. आगामी वर्षात सरासरी पाऊसही झाला, तरी शेतीची परिस्थिती बदलेल.