आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपलं जळगाव करूया स्मार्ट, स्वच्छता अभियानास तरुणाईचा प्रतिसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव स्वच्छ सुंदर करण्यासाठी "दिव्य मराठी'तर्फे हाती घेण्यात आलेल्या मोहिमेला युवक, महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

शहर स्वच्छ, सुंदर करण्यासाठी संकल्प करण्याची तसेच मोहिमेत सहभागी होण्याची तयारीही काहींनी दर्शवली आहे. आम्हालाही हे शहर स्वच्छ, सुंदर असावे, असे वाटते. त्यामुळे मोहिमेत सहभागी होऊन शहराविषयीची आस्था प्रत्यक्षात आणण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. कचऱ्याची समस्या कशामुळे आहे, ती दूर करण्यासाठी काय करावे लागेल, अशी विचारणाही जळगावकरांकडून होत आहे. ‘दिव्य मराठी’ला व्हॉटस्अॅप, एसएमएस ई-मेलच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या प्रतिसादाची वर्गवारी केली असता युवावर्ग आघाडीवर आहे. त्यानंतर गृहिणी, नाेकरदार महिला, शिक्षित तरुण, शासकीय कर्मचारी, डॉक्टर्स, नगरसेवक, काही सामाजिक कामे करणाऱ्यांचाही सहभाग आहे.

प्रतिसाद टक्केवारी
२१ पुरुष
७२ युवक
०७ महिला
सोबत आपले नाव, वॉर्ड क्रमांक, शिक्षण/व्यवसाय ही माहिती पाठवावी
ई-मेलवरही Yes,I promise Jalgaon असेलिहून cleancityjalgaon@gmail.comवरपाठवा.

बंद वाहने सुरू करण्यासाठी धडपड
या उपक्रमाला संपूर्णपणे सहकार्य करण्याची तयारी पालिका प्रशासनाने दर्शवली आहे. या कामासाठी आरोग्य विभागाला येणाऱ्या अडचणी साेडवण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. या दृष्टीने किरकोळ कारणासाठी नादुरुस्त असलेल्या २० वाहनांची दुरुस्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या दृष्टीने सहायक आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी पालिकेच्या आरोग्य विभागातील बंद वाहनांची यादीच वरिष्ठांकडे सादर केली आहे. दुरुस्तीची गरज असलेल्या वाहनांमध्ये १० घंटागाड्या, कचरा कुंड्या, उचलण्यासाठी वापरले जाणारे आठ स्किप लाेडर, नाले सफाईसाठीचे एक मशीन (नाला एस्केव्हेटर) एक व्हॅक्युम क्लिनर बंद असल्याचा अहवाल दिला आहे. वाहनांची दुरुस्ती झाल्यावर या कामाला अधिक गती मिळेल.
आपण व्हॉट‌्सअॅपवरही Yes,I promise Jalgaon असेलिहून ७८७५७१७८८१वर पाठवू शकता.
आपण आम्हाला Yes,I promise Jalgaon असेलिहून ९६७३८६०७७७वर एसएमएस करा.