आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yunus Deshmukh Suicide Case Two Arrest In Jalgaon

युनूस आत्महत्याप्रकरणी पुन्हा दोन जणांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रजा कॉलनीतील युनूस देशमुखच्या आत्महत्येप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. यात रवींद्र वाघ, राजेंद्र बोरसे यांचा समावेश आहे.

मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता शिरसोली नाका येथून चाळीसगाव बसमधून जाण्याच्या प्रयत्नात असताना या दोघांना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस कर्मचारी रवी बिर्‍हाडे, आक्रम शेख, बशिर तडवी, सिद्धार्थ बैसाणे, अकबर खान यांनी ही कारवाई केली.