आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प. बनावट नियुक्ती प्रकरणी दाेघे निलंबित, मिस्तरी, भाेई निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-  जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या नावाने ४६ जणांना बनावट नियुक्तीचे पत्र देऊन अार्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पाणीपुरवठा विभागातील संबंधित दाेन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात अाले अाहे. तसेच या दाेन्ही कर्मचाऱ्यांची चाैकशी करून त्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई सुरू करण्यात अाली अाहे. ‘दिव्य मराठी’ने हे प्रकरण उघडकीस अाणले हाेते. 
 
एरंडाेल पंचायत समितीमध्ये कार्यरत राजू भोजू भोई जळगाव पंचायत समितीमधील हातपंप यांत्रिकी विभागातील सुभाष मिस्तरी (सूर्यवंशी) यांनी जिल्ह्यातील ४६ जणांना बनावट नियुक्तीपत्रे दिल्याची बाब समाेर आली आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या काही पीडितांनी गुरुवारी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात येऊन आपली व्यथा मांडली.
 
त्यांनी आपल्या जावई,नातू यासाठी पीडितांनी आपले घर,शेती गहाण ठेवून लाखो रुपये दिले होते. मात्र, अडीच ते तीन वर्ष वाट पाहूनही नोकरी लागली नाही. त्यामुळे यादीत नावे असलेल्या उमेदवारांनी नेमणुकीसाठी तगादा लावला. तसेच त्यांनी पैसेही परत दिले नाहीत. त्यानंतर एका उमेदवाराच्या पाचाेरा तालुक्यातील दहिगाव संत येथील सासूने अात्महत्या करण्याची धमकी दिल्यानंतर हे प्रकरण समाेर अाले. 
 
गुन्हा दाखल करण्याचे पत्र :या प्रकरणात पाेलिस तक्रार घेत नसल्यामुळे अॅड. प्रतिभा पाटील यांनी अास्तिककुमार पांडेय यांची भेट घेतली. पांडेय यांनी ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताचा उल्लेख करत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पाेलिस अधीक्षकांना पत्र दिले. 
 
एरंडाेल पंचायत समितीमधील राजू भाेई अाणि जळगाव पंचायत समितीमधील सुभाष मिस्तरी (सूर्यवंशी) या दाेन्ही कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सेवेतून निलंबित केले. सुभाष मिस्तरी याला यापूर्वीच एका फसवणूक प्रकरणात २६ मे २०१४ राेजी निलंबित केले हाेते. त्याला पुन्हा निलंबित केले असून सेवेतून कायमचे बडतर्फ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे अादेशही दिले अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...