आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zilha Parishad School Teacher Showed Sexual Video To Girl Students

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींना शिक्षकाने दाखवली अश्लील चित्रफीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पारोळा तालुक्यातील शेळावे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींना शिक्षकाने अश्लील चित्रफीत दाखवण्याचा घृणास्पद प्रकार मंगळवारी उघडकीस आला. त्यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून या शिक्षकावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांच्याकडे अहवाल पाठवला आहे.

शेळावे बुद्रूक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक देविदास सौपुरे हा चौथीच्या वर्गातील विद्यार्थिनींना अश्लील चित्रफीत दाखवत असल्याची बाब विद्यार्थिनींनी पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडीस आला. या प्रकरणी मंगळवारी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकावर जागेवरच कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी या प्रकरणाचा चौकशी अहवाल बुधवारी शिक्षणाधिकारी गाडेकर यांच्याकडे पाठवला आहे. अहवाल पाहिल्यानंतर शिक्षणाधिकारी शिक्षक सौपुरे याच्यावर कारवाईचे आदेश काढणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.