आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिव्हिलचे कर्मचारी प्रतीक्षेतच, तर पोलिसांना मिळाला अग्रीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हासामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे पगार झाल्याने बुधवारी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शल्यचिकित्सकांच्या दालनातच ठिय्या आंदोलन केले. या वेळी प्रशासकीय अधिकारी बेंद्रे यांना बोलावल्यानंतर त्यांनी उर्मटपणे उत्तरे दिल्याने त्यांच्यावर कारवाई करा,अशी मागणी छावाने केली. तसेच वर्ग एकचे प्रशासकीय अधिकारी ८० हजारांचा पगार घेऊनही प्रत्यक्षात १६ हजारांचेही काम करीत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान, पोलिसांना बुधवारी अग्रीम मिळाला तर पगार दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे.

जिल्हा रुग्णालयातील वर्ग ते वर्ग ४चे एकूण ५५० अधिकारी कर्मचारी आहे. दिवाळी सुरू होऊनही त्यांचे पगार झालेले नाही. त्यामुळे मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन पगार करण्याची मागणी केली होती. परंतु, त्यांना आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यामुळे बुधवारी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुनील भामरे यांचे दालन गाठले. त्यांना पगारासंदर्भात जाब विचारला. मात्र, ते समर्पक उत्तरे देण्यास असमर्थ ठरल्याने प्रशासकीय अधिकारी एस. पी. बेंद्रे यांना बाेलवण्याची मागणी केली. बेंद्रे हे अर्धा तासानंतरही अाल्याने पदाधिकाऱ्यांनी ठिय्या अांदाेलन केले. या वेळी संताेष पाटील, नंदू पाटील, गाैरव सपकाळे, केतन पाटील उपस्थित हाेते.

बेंद्रेंच्या कार्यशैलीविषयी डॉ. भामरेंची चुप्पी
जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. भामरे यांना विचारले असता कर्मचाऱ्यांचे पगार गुरुवारपर्यंत हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, बेंद्रे यांच्या कार्यशैलीविषयी विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले.

बेंद्रे हे काही वेळाने आल्यानंतर ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचा अाराेप कार्यकर्त्यांनी केला. त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याची मागणीही केली. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. भामरे यांच्यासमाेर कर्मचाऱ्यांच्या पगाराविषयी कार्यकर्त्यांनी विचारले असता 'मलाही घरदार अाहे. मी महिन्यातून सहा दिवस येताे, काम संपल्यावर निघून जाताे' असे उत्तर दिले. तसेच उरलेले दिवस नाशिक येथे राहत असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यामुळे बेंद्रे हे मुख्यालयी राहत नसल्याने पगार हे दरमहा १५ ते २० तारखेपर्यंत हाेतात. तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांवर, बिलांवर सह्या घेण्यासाठी कर्मचारी नाशिकला जाताे. ताे प्रवास भत्त्यांचे बिलही वसूल करीत असल्याची माहिती मिळाली.
मला घरदार अाहे, मी सहा दिवस येताे

कारवाई करा, अन्यथा आंदोलन
^प्रशासकीयअधिकारीबेंद्रे यांना कर्मचाऱ्यांच्या पगाराची विचारणा केली. त्या वेळी ते मद्यधुंद अवस्थेत हाेते. महिन्यातील दिवसच कामावर येत असल्याची कबुलीही त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांसमोर दिली. त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा तीव्र अांदाेलन छेडण्यात येईल. संताेषपाटील, छावा संघटना
बातम्या आणखी आहेत...