आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्दैवी घटना: जि. प.तील शिपायाची अकोल्यात आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- भगीरथ नगरातील तरुणाने अकोला येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. दुर्दैवीबाब म्हणजे याच तरुणाच्या वडिलांनी सन १९८८ मध्ये तरुणाचा भाऊ आणि बहिणीची हत्या करून पिंप्राळा रेल्वे पुलाजवळ आत्महत्या केली होती.
भगीरथ नगरातील नितीन पंडितराव पाटील (वय ३४) हा जिल्हा परिषदेत शिपाईपदावर कार्यरत होता. त्याचे नऊ वर्षांपूर्वी नंदुरबार येथील प्रियांका पाटील हिच्याशी लग्न झाले होते. त्यांना हार्दिक पाटील (वय ७) नावाचा एक मुलगा आहे. गेल्या महिन्यात प्रियांका हिला आदिवासी विकास प्रकल्पात लिपिकपदावर नोकरी लागली. त्यामुळे मे रोजी प्रियांका अकोला येथे रुजू झाल्या होत्या. अकोल्यातील आदर्शनगरात त्यांनी घरही घेतले होते. त्यासाठी नितीन गेल्या १५ दिवसांपासून अकोल्यात होता. मंगळवारी प्रियांका नेहमीप्रमाणे कार्यालयात गेलेल्या असताना सायंकाळी नितीन याने घराचे कंपाउंड स्वच्छ केले. त्यानंतर झाडांना पाणी दिले.
सायंकाळी वाजेच्या सुमारास दूधविक्रेत्याने आवाज देऊनही काेणी बाहेर आल्याने घरमालकांनी खिडकीतून डोकावून पाहिले, तर नितीन याने गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी प्रियांका यांना निरोप दिला. नितीन याचा मृतदेह खाली उतरवून अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला. त्याठिकाणी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले.
पुन्हा एकदा दुर्दैवी प्रसंग
दूध फेडरेशनमध्ये नोकरीला असलेल्या पंडितराव पाटील यांनी १९८८ मध्ये त्यांचा मोठा मुलगा आणि एका मुलीची हत्या करून त्यांनी पिंप्राळा रेल्वे गेटजवळ रेल्वेखाली आत्महत्या केली होती. त्यामुळे पाटील कुटुंबीयांवर २७ वर्षांनंतर पुन्हा एकदा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे.
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
बुधवारी नितीन याचा मृतदेह भगीरथनगरातील घरी आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीनने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप कळू शकले नाही.
बातम्या आणखी आहेत...