आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प.चा लाचखोर कर्मचारी ताब्यात, चुकीची नोंद रद्द करण्यासाठी लाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गणवेश घोटाळ्याच्या सेवा पुस्तकात झालेली चुकीची नोंद रद्द करण्याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक विनायक बैसाणे याला सोमवारी पकडले.
तक्रारदार पाचोरा तालुक्यातील वरखेडी जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असताना त्यांच्या सेवा पुस्तकात २०१०-११ या वर्षात गणवेश घोटाळा झाल्याची नोंद नजरचुकीने झाली होती. तक्रारदाराच्या सेवा पुस्तकात गणवेश घोटाळ्याची झालेली चुकीची नोंद रद्द होण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी विनायक वनजी बैसाणे -याच्याकडे अर्ज केला होता. मात्र, याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली.