आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावेरमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर - जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर पोचली आहे. पक्षात अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा ठपका किसान भारतीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी केला आहे. तिकीट वाटपात जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवख्यांच्या उमेदवारीसाठी शिफारसी होत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित तीळगुळ वाटप स्नेहमेळाव्यात त्यांनी अपमानास्पद वागणुकीची व्यथा मांडली. तालुक्यात पक्षाची उभारणी करण्यासाठी प्रयत्न केले. कार्यकर्त्यांची फळी तयार केली. मात्र, आता वरिष्ठांकडे चुकीची माहिती पुरवून खच्चीकरणाचे प्रयत्न होत आहेत. यासंदर्भात वरिष्ठांनी दोन दिवसात तोडगा काढावा,अन्यथा पक्षाच्या पदांचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी बैठकीत दिला. तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले अशोक पाटील, गयासुद्दीन काझी, देखरेख संघाचे संचालक प्रभाकर पाटील, यशवंत धनके, ज्ञानदेव महाजन, उखा तडवी, विजय पाटील, जितू पाटील, पांडूरंग पाटील, प्रवीण पाटील, मोहन महाजन, दिलीप सावळे उपस्थित होते. अशोक पाटील यांनी जिल्हाध्यक्षांकडे शिष्टमंडळ नेवून उमेदवारीसाठी समितीची मागणी केली आहे.