आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद अपहारकांडातील आरोपी भास्कर वाघ एक महिना धुळ्यात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - येथील गाजलेल्या जिल्हा परिषद अपहारकांडातील प्रमुख आरोपी भास्कर वाघ कारागृहातून महिन्याभरासाठी पॅरोलवर घरी आला आहे. देवपूर पोलिस ठाण्यात तशी नोंद करण्यात आली आहे. वार्धक्य आणि आजाराने जर्जर झालेला भास्कर वाघ आठवड्यातून दोनदा देवपूर पोलिस ठाण्यात हजेरी लावत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जिल्हा परिषदेत 1990 मध्ये उघडकीस आलेल्या जिल्हा परिषद अपहारकांडातील प्रमुख आरोपी भास्कर शंकर वाघ हा सध्या पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. प्रकृती अस्वास्थ्य आणि चांगल्या वर्तणुकीमुळे भास्कर वाघ एक महिन्याच्या पॅरोलवर सुटी घेऊन घरी आला आहे. 7 जानेवारीला भास्कर वाघला येरवडा क ारागृहातून सोडल्यानंतर त्याने देवपूर पोलिस ठाणे गाठून नोंद केली.
वार्धक्यासोबत आजाराने जर्जर झालेला भास्कर वाघ दर बुधवारी आणि शनिवारी रिक्षा अथवा खासगी वाहनाने पोलिस ठाण्यास हजेरी लावण्यासाठी येतो. चालणेही अवघड झालेल्या भास्कर वाघला त्याच्या कुटुंबातील काही सदस्य आधार देत आणतात, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हजेरीबाबत तशी स्टेशन डायरीला नोंद घेतली जाते आहे.
पॅरोल रजा पूर्ण झाल्यानंतर 8 फेब्रुवारीला भास्कर वाघ पुन्हा कारागृहात रवाना होणार आहेत. तत्पूर्वी देवपूर पोलिस ठाण्यात त्याचा जबाब नोंदविण्यात येईल, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.