आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत साठवण बंधार्‍यांचा प्रश्न गाजला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - साठवण बंधार्‍यांच्या कामाबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत प्रशासनाला पुन्हा धारेवर धरले. जिल्ह्यातील 450 बंधारे, शेततळ्यांची चौकशी जिल्हा परिषद पातळीवर करण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. दरम्यान, सभा सुरू असताना विलासराव देशमुख यांच्या निधनाची वार्ता येताच सभेचे कामकाज थांबविण्यात आले.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी दुपारी छत्रपती शाहू महाराज सभागृहात अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, शिक्षण सभापती रक्षा खडसे, महिला व बालकल्याण समिती सभापती लिला सोनवणे, कृषी सभापती कांताबाई मराठे, समाजकल्याण सभापती राजेंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ उपस्थित होते.
बंधार्‍यांच्या चौकशीचा निर्णय - साठवण बंधार्‍याची कामे अत्यंत नित्कृष्ट आहेत. तसेच पाच कामांना सर्वसाधारण सभेची मान्यता नसतानादेखील पाच बंधार्‍यांचा निधी मंजूर करून तो कामांना वर्ग करण्यात आला आहे. सातत्याने पाच-सहा महिन्यांपासून सदस्य या प्रo्नी आवाज उठवित आहे. मात्र, त्यावर कुठलीच चौकशी केली जात नाही. सिंचन विभागातील अधिकार्‍यांनी साखळी पद्धतीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. यावर गायकवाड यांनी विभागीय उपायुक्तांकडून बंधार्‍यांची चौकशी सुरू आहे. जिल्हा परिषदस्तरावरही याची चौकशी करण्याची मागणी टी.पी. साळुंखे, रमेश पाटील, विजय पाटील यांनी केली. त्यांना इतर सदस्यांनीदेखील पाठिंबा दिला. त्यानुसार समिती गठित करून सर्व बंधार्‍यांची चौकशी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
सीईओंच्या भेटीवर सदस्य नाराज - मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले यांची भेट घेण्यासाठी सदस्यांना बराच वेळ ताटकळत बसावे लागते. याविषयी लिना महाजन, हेमांगिनी तराळ, उद्धव पाटील, संजय गरूड यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे सदस्यांना ताटकळत बसावे लागणार नाही, असे आश्वासन सीईओ उगले यांनी दिले.
सभा आटोपली - सभा सुरू असताना विलासराव देशमुख यांच्या निधनाची वार्ता कळताच सभेचे कामकाज थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी अजेंड्यावरील उर्वरित विषय मंजूर झाल्याचे सांगून सभा आटोपण्यात आली.