आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद अन् खासगी शाळांना पाच सुट्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्ह्यातील खासगी तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांना 26 ते 28 डिसेंबरदरम्यान तीन दिवस सुट्या मिळणार आहेत. 25 रोजी नाताळची सुटी आणि 29 रोजी रविवार असल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना नाताळला लागून सलग पाच दिवस सुटी मिळणार आहे. मराठी शाळांना प्रथमच नाताळला एवढय़ा सुट्या मिळणार आहेत.

2013-14 या शैक्षणिक वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पाच दिवसांची हिवाळी सुटी कमी देण्यात आली होती. मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार शैक्षणिक वर्षातील शिक्षकांच्या कामाचे किमान दिवस व शिक्षणाचे तास निश्चित करण्यात आले आहेत. त्यात पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी किमान 200 दिवस तर सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी 220 दिवस निश्चित केले आहेत. रविवार व शासकीय सुटी वगळता एका वर्षात शाळांना 80 दिवस सुटी देण्याची तरतूद आहे. त्यानुसार जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळांना पाच दिवस हिवाळी सुटी कमी दिल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने येत्या काळात पाच दिवसांची सुटी भरून काढण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात राज्य अध्यक्ष राजेंद्र सपकाळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यात 26 ते 28 डिसेंबरदरम्यान व 19 फेब्रुवारी, 14 एप्रिल 2014 अशा पाच दिवस सुट्या देण्याचे शिक्षण समितीने निश्चित केले आहे.