आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीचा वर्ग व्हरांड्यात भरवून जि.प. शिक्षण विभागाचा निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - प.न.लुंकड कन्या शाळेत गेल्या १५ वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दहावी-बारावीचे परीक्षा साहित्य ठेवण्यासाठी एक खाेली अडकवून ठेवली अाहे. तसेच शिक्षण विभाग शाळेत केव्हाही काेणतेही कार्यक्रम घेतात. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर हाेत अाहे. या प्रकाराविषयी तक्रार केल्यास शाळेवर कारवाईची धमकी दिली जाते. या प्रकारामुळे हैराण झालेल्या मुख्याध्यापकांनी थेट नाशिक बोर्ड विभागीय सचिवांकडे तक्रार केली अाहे. तसेच शुक्रवारी दहावीचा वर्ग व्हरांड्यात पटांगणावर भरवून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात अाला.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास दहावी बोर्डाच्या परिरक्षक कार्यालय क्रमांक सीएन ४४ साठी अाणि साहित्य ठेवण्यासाठी प.न.लुंकड शाळा व्यवस्थापनाने काही काळासाठी एक खोली दिली होती. या आधी या खोलीचा वापर शाळा संगीत विभागाचे साहित्य, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी करीत हाेती. आता शाळेतील विद्यार्थिनींची संख्या वाढल्याने वर्ग कमी पडू लागले आहेत. त्यामुळे यापुढे ही वर्ग खोली शिक्षण विभागाचे साहित्य ठेवण्यास देणे शक्य होणार नसल्याचे पत्र महिन्याभरापूर्वी मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाला दिले आहे. यानंतरही गुरुवारी परीक्षेचे साहित्य याच खोलीत ठेवण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी शाळेच्या व्यवस्थापनाने दहावीचा वर्ग पटांगणात भरवून रोष व्यक्त केला. दुपारनंतर हा वर्ग व्हरांड्यात भरला.
^शाळा व्यवस्थापनाच्या nसहमतीनेच या शाळेत साहित्य कार्यक्रम घेतले जात होते. वर्ग खोली करण्याबाबतची तक्रार महिन्याभरापूर्वी प्राप्त झाली. विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल तर परीक्षेनंतर लुंकड शाळेतील साहित्य काढून घेतले जाईल. -डी.पी.महाजन, माध्य. शिक्षणाधिकारी

स्वतंत्र वर्ग द्यावा
^अपूर्ण वर्गसंख्येमुळे विद्यार्थिनींना बाहेर बसावे लागते, ही शोकांतिका आहे. शिक्षण विभागाच्या दबावतंत्राच्या विरोधात शालेय व्यवस्थापनाने या आधीच तक्रार करणे आवश्यक होते. दहावीचे वर्ष असल्याने त्यांना स्वतंत्र वर्ग उपलब्ध करून द्यावा. अॅड.सुधीर कुलकर्णी, पालक

बाेललेतर धमकी
^शिक्षण विभागाकडून होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमासाठी सक्तीने आमच्या शाळेचा उपयोग करून घेतला जातो. याविरोधात बोलल्यास शाळेवर कारवाईची धमकी दिली जाते. याविरुद्ध नाशिक बोर्ड विभागीय सचिवांकडे तक्रार केली आहे. साधनाभालेराव, मुख्याध्यापक
बातम्या आणखी आहेत...