आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ZP Turn Its Money To The Drought : Chairman Deelip Khodpe

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जि.प.चा स्वनिधी दुष्काळासाठी वळवू : अध्यक्ष दिलीप खोडपे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवत असतानाही जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात दुष्काळ निवारणासाठी कुठलीच तरतूद नसल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले होते. शुक्रवारी अर्थसंकल्पीय सभेत विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. यामुळे दुष्काळासाठी शासनस्तरावरून निधी कमी पडल्यास स्वनिधी वळविला जाईल, असे आश्वासन अध्यक्ष दिलीप खोडपे यांना द्यावे लागले.


जिल्हा परिषदेचा सन 2013-14 चा मूळ आणि सन 2012-13 चा सुधारित अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ ने अंदाज व्यक्त केलेल्या तरतुदी खर्‍या ठरल्या. पदाधिकार्‍यांचे मानधन वाढ, सार्वजनिक आरोग्यावरील तरतूद, गेल्या वर्षापेक्षा यंदा वाढीव तरतुदींची शिफारस हे मांडलेले अंदाजही तंतोतंत खरे ठरले.


जि.प.चा स्वनिधी दुष्काळासाठी वळवू
या अर्थसंकल्पात दुष्काळाच्या उपाययोजनेसाठी तरतूद करण्यासाठी विरोधकांनी आग्रह धरीत त्यावर चर्चा घडवून आणली. संजय गरूड यांनी तोंडापूर येथील सामूहिक पाणीपुरवठा योजनेच्या वीज बिलाची समस्या मांडली. तसेच दुष्काळासाठी स्वतंत्र निधीच्या तरतुदीचा मुद्दा मांडला. यावर जिल्हा नियोजन मंडळाकडून दीड कोटींच्या निधीची मागणी केली. गरज पडल्यास जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून तरतूद केली जाईल, असे अध्यक्ष खोडपे यांनी सांगितले.