जळगाव - संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी २३ रोजी होणार असून, जळगाव तालुक्यातील ५ गट आणि १० गणांची मतमोजणी नूतन मराठा महाविद्यालयात पार पडणार आहे.
सकाळी १० वाजेपासून या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत सर्व गट व गणांचा निकाल जाहीर होईल, असा विश्वासही निवडणूक विभागाने व्यक्त केला आहे. या मतमोजणीवेळी जिल्हा क्रीडा संकुल ते रिंगरोड रस्ता गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, मंगळवारी तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल निकम यांनी मतमोजणी ठिकाणाची पाहणी करून कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. या मतमाेजणीनंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सुमारे ३ हजार उपद्रवी लोकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी जिल्हाभरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येईल.
मतमोजणी पारदर्शकपणे होण्यासाठी गटांसाठी २० स्वतंत्र टेबल, तर गणांसाठी २० टेबल लावण्यात येणार आहेत. मतमोजणीवेळी नूतन मराठा महाविद्यालयाकडील वाहतूकही वळविण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता उमेदवार व प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रांॅगरूम उघडून दहा वाजेला मतमोजणीला सुरुवात होईल. गट व गणांची गणना एकाच वेळी केली जाणार असल्याची माहिती निकम यांनीदिली. मतमोजणीवेळी गटांसाठी दोन गणांसाठी उमेदवार एका प्रतिनिधीला मतमोजणी कक्षात परवानगी देण्यात येणार आहे. एका टेबलवर १८ ईव्हीएम मशीन ठेवण्यात येऊन मतमोजणी केली जाईल.
मतमोजणी ठिकाणावर पोलिस उपअधीक्षकांसह चार निरीक्षक पुरेसा फौजफाटा ठेवण्यात येणार आहे. यासह चारही बाजूंना बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलाकडून उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे. गट गणाचे नाव दर्शविण्यात येणार असून, त्या ठिकाणीच प्रतिनिधीला प्रवेश दिला जाणार असल्याचेही अमोल निकम यांनी सांगितले.
मतमाेजणीदरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये म्हणून पाेलिस प्रशासनाने तगडा पाेलिस बंदाेबस्त तैनात केलेला अाहे, तर हजार १८९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली अाहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात पाेलिस अधीक्षक, अप्पर पाेलिस अधीक्षक, पाेलिस उपअधीक्षक, ३० पाेलिस निरीक्षक, १३० सहायक पाेलिस निरीक्षक/पाेलिस उपनिरीक्षक, हजार ५०० पाेलिस, अारसीपी प्लाटून, ईअारटी प्लाटून, १५ स्ट्रायकिंग फाेर्स असा बंदाेबस्त जिल्हाभरात तैनात केला अाहे.
तीन हजार जणांवर कारवाई
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकूण ३ हजार १८९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यात एमपीडीएनुसार २, कलम १०७नुसार १२८० जणांवर, कलम ११०नुसार २९७, कलम १४९नुसार ११९९, मुंबई दारूबंदी कायदा ९३नुसार १९० जणांवर, मुंबई पाेलिस कायदा ५५, ५६, ५७नुसार २३ जणांवर, कलम १४१/२नुसार २०१ जणांवर कारवाई केली अाहे.
क्रीडा संकुलाकडील प्रवेशद्वाराकडून उमेदवार, अधिकाऱ्यांना देणार प्रवेश
जिल्हा परिषद, पंचायत समितीची मतमाेजणी नूतन मराठा महाविद्यालयात हाेणार अाहे. त्यासाठी २३ फेब्रुवारी राेजी सकाळी १० वाजेपासून मतमाेजणी पूर्ण हाेईपर्यंत जिल्हा क्रीडा संकुल ते रिंगराेडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डाॅ. सुभाष चाैधरी यांच्या दवाखान्यापर्यंतचा रस्ता बंद राहणार अाहे. न्यायालयाकडील नूतन मराठा महाविद्यालयाची दाेन्ही प्रवेशद्वारे बंद राहणार अाहेत. जिल्हा क्रीडा संकुलाकडील प्रवेशद्वाराकडून उमेदवार, अधिकारी, पत्रकारांना प्रवेश दिला जाणार अाहे.
जिल्हाभरात येथे हाेणार मतमाेजणी
जळगाव : नूतन मराठा काॅलेज, सकाळी १० वाजता
भुसावळ : यावल राेडवरील शासकीय गाेदाम, सकाळी ९ वाजता
यावल : चाेपडा राेडवरील हतनूर गाेदाम, सकाळी १० वाजता
बाेदवड : तहसील कार्यालयाचे अावार, सकाळी १० वाजता
मुक्ताईनगर : तहसील कार्यालय परिसर, सकाळी १० वाजता
रावेर : तहसील कार्यालयाचे अावार, सकाळी १० वाजता
पाचाेरा : शहरातील सिंधी समाज मंगल कार्यालय अावार :
सकाळी १० वाजता
चाेपडा : बाजार समिती अावारातील गाेदाम, सकाळी ९ वा.
अमळनेर : स्टेशन राेडवरील इंदिरा भवन, सकाळी ९ वाजता
पाराेळा : नवीन प्रशासकीय इमारतीचे अावार; सकाळी १० वा.
धरणगाव : तहसील कार्यालयाचे अावार, सकाळी ९ वाजता
एरंडाेल : अायटीअाय काॅलेजचे अावार, सकाळी ९ वाजता
भडगाव : उपबाजार समिती सभागृह परिसर, सकाळी १० वाजता
चाळीसगाव : हिरापूर राेड, चव्हाण काॅलेज : सकाळी १० वा.
जामनेर : बाजार समितीचे अावार, सकाळी ९ वाजता.