आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज अभियंत्याला पाच हजाराची लाच घेताना अटक, दंड कमी करण्यासाठी मागितले पैसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाचे प्रमुख अभियंता मंगेश पालवे यांना पाच हजाराची लाच घेताना एसीबी ने अटक केली आहे.  वीज मीटर मध्ये असलेल्या फेरफेरी प्रकरणात झालेला दंड कमी करण्यासाठी पालवे यांनी तक्रारदाराला लाच मागितली होती. 


मिळालेल्या माहितीनुसार नवापूरमध्ये 27 फेब्रूवारीला पालवे यांनी तक्रारदाराच्या घरी धाड टाकली होती. त्यानंतर त्यांनी मीटर तपासला असता त्यात फेरफार केल्याचे आढळले होते. यानंतर पालवे यांनी दुस-या दिवशी तक्रारदाराला नंदुरबार येथे बोलावून घेतले व 70 हजार रुपये दंड भरावा लागेल असे सांगितले होते. दंडाची रक्कम कमी करायची असेल तर मला पाच ते सहा हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार मुंबईला निघून गेला. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला. आज पालवे नंदुरबारमध्ये तक्रारदाराकडून लाचेचे पैसे घेण्यासाठी येणार होता. त्यावेळी आधीच सापळा रचला होता. पालवेला रंगेहाथ पकडण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...