आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूरमध्ये एसटी डेपो शेजारच्या हाॅटेलमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट, दोन हाॅटेल जळून खाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- नवापूर शहरातील एका हाॅटेलमध्ये एक गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने दोन हाॅटेल जळून खाक झाली आहेतय यात लाखोंचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्नीशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर शहरातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डेपो जवळील एका हाॅटेल मधील गॅस सिलेंडरमध्ये  गुुुरुवारी दुपारी स्फोट झाला. बघता-बघता हाॅटेलमध्ये आग लागली. ही आग शेजारच्या हाॅटलमध्येही पसरली. अग्नीशमन दलाला माहिती मिळेपर्यंत दोन्ही हाॅटेल जळून खाक झाले. यात कुठलीही जिवितहानी झाली नाही. नवापूर नगर पालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला. 

बातम्या आणखी आहेत...