आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाब मलिकांचा पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पीएसआय निलेश मोरेंना धमकीचा फोन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दोंडाईचा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि उपपोलिस निरीक्षक निलेश मोरे यांना फोन वरून धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवाब मलिक यांनी 9867355014 या मोबाइल क्रमाकांवरून फोन आल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले आहे. याप्रकरणी पाटील यांनी स्टेशन डायरीत नोंद केली आहे.

 

काय आहे हे प्रकरण?  

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या मानहानी व बदनामीच्या गुन्ह्यात नवाब मलिक यांना
चौकशीसाठी दोंडाईचा पोलिसांनी पत्र पाठवले होते. नंतर नवाब मलिक यांनी थेट पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि उपपोलिस निरीक्षक निलेश मोरे यांना फोन करून नमकी दिली.

 

पोलिस निरीक्षकांनी केली बदलीची विनंती..
हेमंत पाटील यांनी पोलिस महासंचालक आणि पोलिस निरीक्षक यांना पत्र लिहून बदली करण्याची विनंती केली आहे. नेते फोन करुन धमकी देतात. मानसिक त्रास देतात, असेही पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि उपपोलिस निरीक्षक न‍िलेश मोरे यांचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...