आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राईनपाडा हत्याकांड, दाट जंगलात लपलेल्या दशरथला अटक; पाठलाग करून पाेलिसांनी पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात नाथपंथी डवरी समाजातील पाच भिक्षुकांच्या हत्याकांडातील आणखी एक प्रमुख आरोपी दशरथ पिंपळसे याला पोलिसांनी अटक केली आहे. जमावाला चिथावणी दिल्याचा तसेच पीडितांना मरेपर्यंत मारल्याचा आरोप त्याच्यावर होता. गेल्या रविवारी घटनेनंतर दशरथ फरार होता. पोलिसांनी त्याला जवळच्या जंगलातून पाठलाग करत अटक केली.  कळंबीरच्या जंगलात दशरथ लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीचे पथक दोन दिवसांपासून जंगलाजवळ तळ ठोकून होते.
 

एक वृद्धही जेरबंद
रविवारी रात्री उशिरा आणखी एक संशयित गुलाब रामा पाडवी (वय ५५), रा. चौपाळा) याला अटक करण्यात आली. गुलाब याने हत्येनंतर खात्री करण्यासाठी पाचही मृतांच्या नाड्या तपासल्या होत्या.


जमावाला देत होता चिथावणी 
राईनपाडा गावात नवनाथ गोसावी समाजाच्या पाच जणांची अक्षरशः ठेचून हत्या करण्यात आली होती. मुले पळवणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याचा त्यांच्यावर संशय होता. त्यामुळे लोकांनी त्यांना चांगलीच मारहाण केली. यावेळी दशरथ हा जमावाला या सर्वांना मारण्यासाठी चिथावणी देत होता हे पोलिसांच्या लक्षात आले. विविध व्हिडिओवरून पोलिसांना ही माहिती मिळाली. दशरथच्या चिथावणीमुळे हे पाचही जण मेल्यानंतरही लोक त्यांना राक्षसाप्रमाणे मारहाण करत होते. 

बातम्या आणखी आहेत...