आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरपुरमध्ये जमावाचा पोलिसांवर हल्ला; तीन वाहने फोडली, सहा पोलिस जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर- तालुक्यातील दुर्बुळ्या गावात जमावाने पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात पोलिस अधिका-यासह 6 पोलिस कर्मचारी जखमी झाले असून तीन गाड्यांचे नुकसान झाले आहे. जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल केले असून यात एका महिला पोलिसाचा देखील समावेश आहे. दोन गटांत मध्यस्थी करण्यासाठी पोलिस गेले होते त्यावेळी हा हल्ला करण्यात आल्याचे समजते. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, जमावाच्या हल्ल्यात उपविभागीय अधिकारी संदीप गावित, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण खेडकर, हवालदार संजय संभू नगराळे, शामसिंग धर्मा वळवी, अनंत भानुदास पवार व यमुना परदेशी हे जखमी झाले आहेत.


दुर्बुळ्या येथील युवक आणि बटवापाड्याचा जावई याने काही दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. ही आत्महत्या बटवापाड्याच्या जंगलात केली होती .या संदर्भात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. युवकाच्या मृत्यू संदर्भात दोन्ही गावातील आदिवासींमध्ये बैठका सुरू होत्या. तसेच पोलिसांकडून चौकशी सुरू होती. चौकशी करीता पोलीस दुर्बुळ्या गावाकडे गेले होते. यावेळी गावात जमाव जमून त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यात लाठ्या-काठ्या व दगडांनी हल्ला केल्याने सहा जण जखमी झाले आहेत. यात पोलिसांच्या तीन गाडया जमावाने फोडल्या आहेत.

 

पुढील स्लाईडव पहा जखमी पोलिसांचे आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...