आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० सेकंदांची लोकल क्लिप वगळता १५० ग्रामसेवक, सरपंच २ तास बसून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - 'सत्याग्रह ते स्वच्छते'तून पंतप्रधानांशी संवाद साधायला अातुर दीडशेपेक्षा जास्त सरपंच व ग्रामसेवकांना मंगळवारी दाेन तास केवळ मूकदर्शक म्हणून बसून राहण्याची वेळ अाली. वीस सेकंदांची लाेकल प्रतिनिधींची क्लिप वगळता प्रत्यक्ष पंतप्रधानांशी अनुभव कथन झाले नाही. संवाद झाला नाही म्हणून सूर हरवला. त्यामुळे बिहारमधील चंपारण्य येथील लाइव्ह कार्यक्रम पाहतच वेळ घालवावा लागला. जिल्हाधिकारीही यात सहभागी असल्याने बसून राहण्यापलीकडे काेणाला काहीच करता अाले नाही. बाहेरगावाहून अालेल्यांचा त्यामुळे काही प्रमाणात हिरमाेडही झाला. 


बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह शताब्दी वर्षाचा समारोप मंगळवारी झाला. त्यानिमित्त 'सत्याग्रह ते स्वच्छतागृह' कार्यक्रम झाला. यानिमित देशभरात झालेले स्वच्छतेचे कार्यक्रम पाहता यावे. त्यातून प्रेरणा मिळावी यासाठी देशभरातील वीस गावांची निवड झाली हाेती. त्यात धुळे शहराचा समावेश हाेता. त्यासाठी जिल्हाभरातून दीडशे सरपंच व ग्रामसेवकांना स्वच्छतादूत म्हणून बाेलावण्यात अाले हाेते. त्यांच्याशी पंतप्रधान संवाद साधतील, असे सांगण्यात अाले हाेते. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात थेट प्रक्षेपण व पंतप्रधानांशी संवाद साधता यावा यासाठी दिल्ली दूरदर्शनची संपूर्ण यंत्रणा तीन दिवसांपासून कार्यरत हाेती. मात्र कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र माेदी हे भाषण संपल्यानंतर लगेच निघून गेले. त्यांनी काेणत्याही स्वच्छतादूतांशी संवाद साधला नाही. त्यामुळे तब्बल दाेन तासांपासून बसून असलेल्या सरपंच, ग्रामसेवक व सभागृहातील सर्वांचा हिरमाेड झाला. 

 

उत्सुकता अन‌् टाइमपास 
पंतप्रधान स्वच्छतादूतांशी संवाद साधणार असल्याने प्रत्येकाला उत्सुकता हाेती. मात्र कार्यक्रमात भाषणे, उद‌्घाटन, सत्कार अादी कार्यक्रम सुरू असल्याने उपस्थित ग्रामसेवक, ग्रामसेविका व सरपंचांपैकी काहींना डुलक्या लागल्या हाेत्या. तर काही जण भाषण सुरू असताना मोबाइलवर व एकमेकांशी बोलत होते. इतरही काही जण साेशल मीडिया, माेबाइलमध्ये व्यग्र हाेते. पंतप्रधानांचे भाषण सुरू असताना दुपारी १.१८ वाजता धुळे येथील सभागृह स्क्रीनवर दाखविले गेल्याने काही क्षणासाठी सभागृहात उत्साह वाढला हाेता. 

बातम्या आणखी आहेत...