आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इफेक्ट- अवघ्या पाच तासातच मिळाली एफडीची रक्कम, दोन महिने मारत होते चकरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या बोगस फिक्स डिपॉझिट पावत्या बनवून अनेक ग्राहकांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यासंदर्भात दिव्य मराठीने आज मंगळवारी (22 मे रोजी वृत्त प्रकाशित केले. शिवाय अवघ्या पाच तासात पीडित व्यक्तीला एफडीची पूर्ण रक्कम मिळवून दिली. 

 

नवापूर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा डेपो समोरील साई श्रध्दा मेन्स पार्लर चे संचालक उमाकांत देवीदास हिरे यांनी एसबीआयच्या एका एजंटकडे एफडी केली होती. मात्र जेव्हा एफडीचा कालावधी पूर्ण झाला आणि ते बॅंकेत पैशासाठी गेले असता त्यांना ही एफडी बोगस असल्याचे सांगताच धक्का बसला. याबाबत आज मंगळवारी दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित केले.

 

 

हे वृत्त प्रकाशित होताच नवापूर भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी कल्पेश सिंग यांच्या दालनात शाखाधिकारी कल्पेश सिंग, तक्रारदार उमाकांत देवीदास हिरे, बनावट एफ डी देणारे अशोक वसावे, सामाजिक कार्यकर्ते प्रभु गावित, सेवा निवृत्त बॅकेचे अधिकारी मधुकर पाटील, नगरसेवक खलील खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अमृत लोहार, ग्राहक सेवा केंद्राचे संचालक सुरेश पाटील, नाभिक समाजाचे अध्यक्ष सुधीर निकम, दिव्य मराठी प्रतिनिधी नीलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अशोक वसावे यांनी १ लाख ४५ रोख दिले. उर्वरित २५ हजार आधी दिले होते असे एकूण 1 लाख 70 हजार रूपये रोख दिले. 

एका गरीब नाभिकाला न्याय मिळवून दिल्याबद्दल नगरसेवक मिनल लोहार, नाभिक समाजाचे अध्यक्ष सुधीर निकम व हिरे परिवाराने दिव्य मराठीचे जाहिर आभार व्यक्त केले. बनावट एफ डी बँकेत जमा केली.

 

उमाकांत देवीदास हिरे यांचा जवळील एक लक्ष रूपयांची फिक्स डिपाॅझिट खाते क्रमांक ३७७५६४४६१०५, दोन महिन्याचा कालावधीसाठी १० टक्के व्याजदराने २६ जानेवारी २०१८ रोजी काढली एफ. डी, दुसरी एफ डी खाते क्रमांक ३७२५६०८०६५७ यावर तीन महिन्यांचा कालावधीसाठी ७० हजारची एफ.डी 2 एप्रिल २०१८ रोजी काढली.होती. असे एकूण एक लक्ष ७० हजार ६५ रूपयांची एफ डी च्या बनावट पावत्या स्टेट बँकेत शाखाधिकारी कल्पेश सिंग दालनात जमा करण्यात आल्या. भारतीय स्टेट बँक व स्टेट बॅक सेवा केंद्रावर कुठेही तक्रार नाही असे लेखी पत्र स्टेट बँक सेवा केंद्राचे संचालक यांनी लिहून घेतले.

 

दिव्य मराठीचे मानले आभार 

उमाकांत हिरे वडील देवीदास हिरे यांनी दोन महिन्यापासून पैसे मिळत नसल्याने भास्कर समूहाचे दिव्य मराठी आमची बातमी देऊन अवघ्या पाच तासात लाखो रुपये काढून दिल्याने हिरे परिवार दिव्य मराठी आभार व्यक्त करतो

बातम्या आणखी आहेत...