आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूकबधिर तरुणीशी विवाह करून तरुणाचा अादर्श, साधेपणाने केला विवाह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवविवाहितांना रक्कम जमा झाल्याचे पासबुक देताना कैलास मराठे. - Divya Marathi
नवविवाहितांना रक्कम जमा झाल्याचे पासबुक देताना कैलास मराठे.

शिरपूर - येथील मराठा समाजातील तरुणाने मूकबधिर मुलीशी विवाह करून समाजापुढे अादर्श निर्माण केला. या विवाहाची माहिती एच.आर. पटेल विद्यालयातील शिक्षक कैलास सोमा मराठे यांच्या माध्यमातून कॅनडातील रहिवासी विजय सुधीर मराठे यांच्यापर्यंत पाेहाेचली. त्यांनी नवदांपत्याला ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. विवाहाच्या दिवशीच नवदांपत्याच्या युनियन बँकेच्या संयुक्त खात्यात ही रक्कम जमा झाली.

 

शहरातील गणेश कॉलनीतील रहिवासी भटू पांडुरंग मराठे हा गवंडी काम करतो. लहान असतानाच त्याचे पितृछत्र हरपले. त्याने समाजातील सुनीता राजेंद्र मराठे या मूकबधिर मुलीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी समाजातील ज्येष्ठांनी पुढाकार घेतला. या दोघांचा विवाह पाटण येेथील आशापुरी माता मंदिरात साधेपणाने झाला. अपंगत्वाचा स्वीकार करत या मुलीने अनेक कला हस्तगत केल्या आहेत.

 

तिच्या शारीरिक अपंगत्वाकडे दुर्लक्ष करून तिच्या कलागुणांची जाण ठेवणारा पती तिला मिळाला. भटू पांडुरंग मराठे हा सामान्य घरातील मुलगा आहे. शिरपूर मराठा समाजाचे उपाध्यक्ष आनंदा सखाराम मराठे कार्याध्यक्ष विजय नथ्थू मराठे यांच्या मध्यस्थीने हा विवाह जुळला.


या विवाहाची माहिती येथील एच.आर. पटेल विद्यालयातील शिक्षक कैलास सोमा मराठे यांनी चोपडा येथील रहिवासी सध्या कॅनडात वास्तव्य करणारे विजय सुधीर मराठे यांना सांगितली. यातून विजय मराठे यांनी नवदांपत्याला ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. त्यांच्या या अनपेक्षित मदतीने उभयतांचे कुटुंब भारावून गेले. त्यांचे अनुकरण करत समाजातील दिनकर पुंजो पाटील, प्रवीण विलास चौधरी, दिनेश ताराचंद मराठे या पुणेकरांनीही मदतीचा हात पुढे केला. तर येथील मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख शिक्षक गोपाल मराठे यांनी शासकीय अनुदानातून ५० हजार मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.


समाजात चांगला संदेश
समाजाला अशा आदर्शवादी तरुणांची गरज आहे. भटू मराठे या तरुणाचे पितृछत्र लहानपणीच हिरावले गेले. त्याची आई कोकिलाबाई या सामाजिक कामात अग्रेसर असतात. त्यांनी आपल्या कृतीतून समाजात चांगला संदेश दिला आहे.
- कैलाससोमा मराठे, सदस्य मराठा समाज मंडळ

बातम्या आणखी आहेत...