आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेव्हेंबरपासून अाॅनलाइन घरपट्टीत 1 टक्का सूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अार्थिक वर्षातील पहिले सहा महिने उलटल्यानंतर १,२०० काेटींपैकी जेमतेम २५ टक्के म्हणजेच तीनशे काेटी रुपयांपर्यंत करवसुली झाल्याचे बघून चिंतित झालेल्या अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी अाता घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी अाॅनलाइन करदात्यांना सवलत दिली अाहे. नाेव्हेंबरपासून अाॅनलाइन कर भरल्यास घरपट्टीत एक टक्का, तर पाणीपट्टीत अर्धा टक्का सवलत मिळणार अाहे. अाॅनलाइन कर भरण्याची सवय लावण्याचाही प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार अाहे.
महापालिका क्षेत्रात सुमारे चार लाख १७ हजार मिळकती सुमारे दोन लाख नळ कनेक्शनधारक असून, दाेघांकडून साधारणत: दाेनशे काेटींपर्यंत महापालिकेला उत्पन्न अपेक्षित अाहे. मात्र, अनेक वर्षांपासून हे उद्दिष्ट पूर्ण करता करता महापालिकेच्या नाकीनऊ येत अाहेत.
मध्यंतरी महापालिकेने एप्रिल ते जून यादरम्यान सवलत याेजनेद्वारेे घरपट्टी पाणीपट्टी वसुलीचा प्रयत्न केला. त्यात एप्रिल महिन्यात घरपट्टी भरल्यास टक्के, मे महिन्यात टक्के, तर जूनमध्ये भरल्यास टक्के देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या वर्षी त्यास चांगला प्रतिसाद मिळालार् मात्र चालू वर्षी करधारकांनी उदासीनता दाखवली. दरम्यान, निर्धारित मुदतीनंतरही कर भरल्यास मात्र दरमहा दोन टक्के शास्ती दंडात्मक कार्यवाहीद्वारे वसूल केली जाते. चालू वर्षी निवडणुका असल्यामुळे महापालिकेला करवसुलीत अपयश येण्याची भीती वाटत अाहे. निवडणूक कामात कर्मचारी व्यस्त राहणार असल्यामुळे त्याचा उत्पन्नावर परिणाम हाेण्याची भीती महापालिका प्रशासनाला वाटत अाहे.

दरम्यान, सध्या करवसुलीतच कर्मचाऱ्यांचा माेठा वेळ जात अाहे. या पार्श्वभूमीवर आॅनलाइन कर भरल्यास महापालिका आणि करदात्यांचा खर्च आणि वेळेत बचत होऊ शकते. या पार्श्वभूमीवर येत्या नोव्हेंबरपासून सवलत योजना सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार आॅनलाइन कर भरल्यास घरपट्टीत एक टक्का जास्तीत जास्त ५०० रुपयांपर्यंत, तर पाणीपट्टीत अर्धा टक्का सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. २०१७-१८ पासून प्रति वार्षिक माहे एप्रिल ते मार्चपर्यंत पुढील धोरण निश्चित होईपर्यंत ही सवलत योजना लागू राहणार आहे. याव्यतिरिक्त घरपट्टीत यापूर्वी सोलर वॉटर हीटरचा वापर करणाऱ्यांना देण्यात आलेली सूट प्रतिवर्षी एप्रिल टक्के, मे टक्के जूनमध्ये टक्के ही सूटदेखील कायम राहणार आहे.
बातम्या आणखी आहेत...