आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकरोडला वर्षभरामध्ये बसविणार एक हजार सीसीटीव्ही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी, शहरातील सुरक्षितता वाढविण्यासाठी, टपोरी आणि रोडरोमियो यांच्या जाचातून महिला आणि मुलींना संरक्षण मिळण्यासाठी रोटरी क्लब आॅफ नाशिक व्हीजन नेक्स्ट, दैनिक दिव्य मराठी आणि रेड एफ. एम. यांच्या संयुक्त विद्यमाने जून २०१८ पर्यंत नाशिकरोड, जेलरोड, उपनगर, देवळालीगाव, विहीतगाव, लामरोड, सुभाषरोड या परिसरात सुमारे एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांतून सर्व हालचाली नाशिकरोड आणि उपनगर पोलिसांना टिपणे सहज शक्य होणार असल्याने गुन्हेगारीला आळा बसणार आहे. 
 
नाशिक शहरातील वाढती लोकसंख्येमुळे आणि गुन्हेगारीमुळे प्रत्येक ठिकाणी पोलिसांच्या अपुऱ्या बळामुळे लक्ष ठेवणे कठीण होत आहे. तर शहरातील सुरक्षेसाठी आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील हालचालीवर लक्ष ठेवणे पोलिसांना सोपे जाणार असल्याने यासाठी रोटरी क्लब आॅफ नाशिक व्हीजन नेक्स्ट ने नाशिकरोड, जेलरोड, उपनगर, विहीतगाव, देवळालीगाव, रेल्वे स्टेशन परिसर, सुभाषरोड, लामरोड, बिटको हाॅस्पिटल, मुक्तीधाम, शिवाजी महाराज पुतळा यासह आदी महत्त्वाच्या जागांवर डिलींग हायडेन्सिटी (एच.डी) कॅमेरे बसविण्यात येणार आहे. सध्या केबल टाकण्याचे काम वेगाने सुरु आहे. यासाठी सुमारे २५ ते ३० लाख रुपये खर्च होणार असुन यामध्ये स्थानिक बांधकाम व्यावसायिक देखील सहभागी झाले आहते. 

सध्या पहिल्या टप्प्यातसात ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असुन दर महिन्याला ८० ते १०० कॅमेरे हे पोलीस ठाण्याच्या मार्गदर्शनानुसार बसविले जाणार असल्याचे रोटरीचे अध्यक्ष कौसर आझाद यांनी सांगितले. यासाठी सेक्रेटरी अजीत गुप्ता, प्रकल्प संचालक दिनेश खांदरे, अँड.अतुल देशमुख, विनायक बेडीस, डाँ.पमिता सुराणा यांचाही यामध्ये सहभाग आहे. 
 
येथे बसविणार सीसीटीव्ही कॅमेरे:जाॅकीशोरुम, एच.डी.एफ.सी.बँक, कोटक महिंद्रा बँक बिटको चौक, जामा मशिद काॅर्नर, एम.जी.रोड, गेणुजी गायकवाड मार्ग, फ्रुट मार्केट काँर्नर, मनपा विभागीय कार्यालय, अनुराधा चौक, सत्कार पाँईट,दत्त मंदिर चौक, उपनगर नाका, सम्राट ग्रुप चौक, फेम टाँकिज, नाशिक क्लब,म्हसोबा मंदिर,जेतवन नगर, पासपोर्ट आँफिस, रेजीमेंन्टल प्लाझा, टाकळी चौक, अशोक स्कुल मार्ग, टाकळी घाट, सी.एन.पी. मदिना चौक, गांधी पुतळा चौक, दसक पुल, मुक्तीधाम, अनुराधा चौक, विहीतगाव, मथुरा चौक, दत्तमंदिर, शिवाजी नगर, पंचशीलनगर, वालदेवी नदी, गणपती विसर्जन स्थळ, तपोवन चौफुली, वडाळा टी पाॅइंट, एसटीपी प्लांट, नारायण बापु नगर चौक, पोतदार इंटरनँशनल शाळा,दत्तनिवास बिल्डींग समोर, उपनगर भाजी मार्केट, नविन चाळ उपनगर, दुर्गा मंदिर जुना सायखेडा रोड, इंगळे नगर पाण्याची टाकी, कँनाल रोड, शिखरेवाडी मैदान, ड्रिम अँव्हेन्यु सीएनपीची मागील बाजु, अर्णव स्वीटस, पाटीदार भवन, मोटवानी रोड, पेढारकर काँलनी, एलआयसी आॅफिस, सोमाणी गार्डन, क्वाॅलिटी स्वीट‌्स, मनपा शाळा क्रमांक १२५, साई मंदिर रोकडोबावाडी, स्वामी समर्थ मंदिर दत्त मंदिर रोड, जलतरण तलाव यासह प्रमुख चाैकांमध्ये हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार अाहेत. याबद्दल शहरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत अाहे. त्यामुळे गुन्हेगारीला अाळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत अाहे. 

पाेलिस प्रशासनास मदत 
^रोटरी क्लब अाॅफ नाशिक व्हीजन नेक्स्ट, दैनिक दिव्य मराठी आणि रेड एफ. एम. यांच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस प्रशासनाला मदत होणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणेदेखील सोपे जाणार आहे. -पंढरीनाथ ढोकणे, वरीष्ठ पोलीस निरिक्षक 

^रोटरीच्या माध्यमातुन नेहमी सामाजिक उपक्रम राबविले जातात. सीसीटीव्ही कँमरे बसविल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असुन शहरातील महिलांना एक सुरक्षा मिळणार आहे. त्यामुळे उपक्रमात ज्या संस्थांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी ९३७००६५८३४ यावर संपर्क साधावा. -कौसर आझाद, अध्यक्षरोटरी क्लब आँफ नाशिक व्हीजन नेक्स्ट 
बातम्या आणखी आहेत...