नाशिक - समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात देण्यासाठी नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित पंधराव्या नाशिक रनमध्ये १० हजारांहून अधिक अाबालवृद्धांनी सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीबाबत योगदान दिले. मकरसंक्रांतीच्या सकाळी गुलाबी थंडीत पिस्ता रंगाचा आकर्षक टी शर्ट परिधान करून लहानग्यांसह तरुण, महिला ज्येष्ठांनी धाव घेताच महात्मानगरचा पूर्ण परिसर नेत्रसुखद अशा फिकट हिरव्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसलेे.
मान्यवरांसह विशेष बालके अाणि नागरिकांच्या उपस्थितीत गटा-गटाने रनला प्रारंभ करण्यात अाला. सकाळी पासूनच वातावरण चैतन्यमय झाले हाेते. विशेष आमंत्रित मुख्य पाहुण्यांचे स्वागत रनचे अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी यांनी केले. महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ऑलिंपिक मॅरेथॉनपटू कविता राऊत प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या हस्ते ज्याेतप्रज्वलन करण्यात आले. सौमित्र भट्टाचार्य यांनी कविता राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
क्रीडापटू संजीवनी जाधवचा सत्कार तिच्या आईने स्वीकारला. रंगीबेरंगी फुगे हवेत सोडून रनचा शुभारंभ झाला. यावेळी अतुल नारंग इन्स्टिट्यूटच्या कलाकारांनी नयनमनोहर नृत्य सादर केले. सहभाग नोंदविणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. टीडीके इप्काॅसकडून बाॅशकडे नाशिक रनचा ध्वज सुपूर्द करण्यात अाला. अनिल दैठणकर यांनी अाभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा व्यवस्था बघण्याचे काम स्नेहा ओक यांनी केले. शहरात शनिवारी सकाळी आयोजित ‘नाशिक रन’मध्ये चिमुकल्यांचा सहभाग अन् त्यांचा उत्साह सर्वांसाठीच अत्यंत प्रेरणादायी ठरावा असाच होता.
गरजूंना मदतीचा हेतू
२००३मध्ये बाॅश, टीडीके इप्काॅस काही समविचारी कंपन्यांनी एकत्र येऊन ‘नाशिक रन’ची स्थापना केली हाेती. दरवर्षीच्या जानेवारी महिन्यातील दुसऱ्या शनिवारी अायाेजित केल्या जाणाऱ्या या सामाजिक उपक्रमामुळे शहरात नवचैतन्य निर्माण हाेते.
टीम टीडीकेने दिली चार लाखांची देणगी
रनचेयंदाचे प्रायाेजक असलेल्या टीडीके इप्काॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पगारातील एकूण चार लाख रुपयांची भरीव देणगी टीम टीडीके नावाने दिली. गतवर्षी रनच्या माध्यमातून ८५ लाख रुपयांचा निधी गाेळा झाला हाेता. यंदा सुमारे एक काेटी रुपयांचे लक्ष्य निर्धारित करण्यात अाले अाहे. नाशिक रन २०१७ च्या यशस्वितेसाठी टीडीके इप्काॅस बाॅशच्या ३०० हून अधिक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
या मान्यवरांचा सहभाग
व्यासपीठावररनचे संस्थापकीय विश्वस्त बॉशचे व्यवस्थापकीय संचालक सौमित्र भट्टाचार्य, बॉशचे कार्यकारी संचालक अॅन्ड्रिस वाेल्फ, रनचे संस्थापकीय विश्वस्त टीडीके इप्काॅसचे व्यवस्थापकीय संचालक एन. बालाकृष्णन, पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल, रनचे माजी विश्वस्त एस. एम. हेगडे, श्रीनिवास कुमार, रनचे उपाध्यक्ष बाॅशचे वाणिज्य उपाध्यक्ष एच. बी. थाेन्टेश, रनचे उपाध्यक्ष बाॅशचे उपाध्यक्ष अविनाश चिंतावर , मुकुंद भट, राजाराम कासार, सुधीर येवलेकर, प्रबल रे, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, नगरसेविका छायाताई ठाकरे आदी उपस्थित होते.