आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी शाळांतून दहा हजार विद्यार्थ्यांची गळती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका हद्दीतील मराठी शिक्षणाची अवस्था वर्षागणिक बिकट हाेत अाहे. गत चार वर्षांतील उपलब्ध शासकीय अाकडेवारी पाहता महापालिकेच्या मराठी शाळांमधून गत चार वर्षांत कमी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८००० पेक्षा जास्त अाहे. तर, खासगी मराठी शाळांमधून कमी झालेली विद्यार्थी संख्या सुमारे १२०० अाहे. इंग्रजीचे वाढते महत्त्व अाणि मराठी शाळांमधील शिक्षणाबाबत पालकांना काेणतीच शाश्वती वाटेनाशी झाल्याने महानगरांमधील शाळांतील महापालिका अाणि खासगी शाळांमधील शाळांतील मुलांच्या पटसंख्येवरही त्याचे परिणाम जाणवू लागले अाहेत.

खासगी शाळांसाठीही धाेक्याची घंटा : दरवर्षी मनपा अाणि खासगी शाळांमधील पटसंख्या कमी हाेत असली तरी त्या तुलनेने खासगी शाळांमधून विद्यार्थी संख्या कमी हाेण्याचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी दिसत अाहे. मात्र, एकीकडे खासगी इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे प्रमाण हजारांनी वाढत असताना खासगी मराठी शाळांमध्ये काेणत्याच वर्षी विद्यार्थी संख्या वाढणे; किंबहुना काही शेकड्यांनी का असेना कमी हाेणे ही या शाळांसाठी धाेक्याची घंटा ठरत अाहे.

ग्रामीण भागातही प्रमाण घसरले : ग्रामीण भागात शिक्षणाला सुरुवात करणाऱ्यांची संख्या पहिल्या वर्षी ५० असेल, तर दहावीपर्यंत त्यातील १८ विद्यार्थीदेखील पाेहाेचत नाही. म्हणजेच दहावीपर्यंत ३२ टक्केच विद्यार्थी पाेहाेचतात. इतक्या माेठ्या प्रमाणात हाेणारी गळती रोखण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न करूनही त्याचादेखील फारसा परिणाम झालेला नाही, हे यामागचे वास्तव अाहे.

राज्यस्तरावर दखल घेतली जावी
मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी हाेण्याच्या या प्रकाराकडे वेळीच गांभीर्याने बघायला हवे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती अाहे. त्यामुळे राज्य शासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन उपाययाेजना करणे अावश्यक अाहे. - सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष , नाशिक एज्युकेशन साेसायटी
बातम्या आणखी आहेत...