आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाेपडा लाॅन्स ते फाॅरेस्ट नर्सरीलगत शंभर मीटर ग्रीन काॅरिडॉर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंगापूरराेडच्या उत्तर बाजूच्या शंभर मीटर जागेचा गाेदावरी नदी संवर्धन याेजनेंतर्गत विकास करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, त्याचाच एक भाग म्हणून गाेदावरी नदीच्या उत्तर बाजूला फाॅरेस्ट नर्सरी ते चाेपडा लाॅन्स-हनुमानवाडीपर्यंत २४ मीटरचा रस्ता हाेणार अाहे. उर्वरित ६६ मीटर जागेत उद्यान अॅम्युझमेंट पार्कही उभारले जाणार असल्याचे अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. त्यासाठी किनाऱ्यालगतची जागा अारक्षित करण्यासाठी विकास अाराखड्यात तरतूदही केली जात अाहे.
गाेदावरी संवर्धनासाठी पालिकेचेे प्रयत्न सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून गंगापूरराेडच्या पलीकडे असलेल्या किनाऱ्यालगत असलेल्या जागेचा याेग्य पद्धतीने वापर करण्याचा विचार सुरू अाहे. या भागाकडील जमिनीवर हाेणारे अतिक्रमण वा झाेपडपट्टी वसण्याचे धाेके लक्षात घेत किनाऱ्यापासून शंभर मीटरपर्यंतच्या जागेचा नियाेजनबद्ध विकास करण्याची संकल्पना अाहे. त्याचाच एक भाग म्हणून या शंभर मीटरपैकी जवळपास २४ मीटर जागेवर रस्ता केला जाणार अाहे. त्यासाठी विकास अाराखड्यात अारक्षण टाकून किनाऱ्यावरील जमीनमालकांची जागा ताब्यात घेतली जाणार अाहे. या रस्त्यासाठी एक मलजलशुद्धीकरण केंद्राची जागाही तूर्तास बदलण्यात अाल्याचे अायुक्तांनी सांगितले. या रस्त्यामुळे गंगापूर रस्त्याला समांतर माेठा रस्ता उपलब्ध हाेणार असून, रामवाडीच्या दिशेने अानंदवलीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गही उपलब्ध हाेईल. २४ मीटरचा रस्ता गेल्यानंतर उर्वरित जवळपास ६६ मीटर जागेचा वापर करून अॅम्युझमेंट पार्क वा उद्यान करण्याचा विचार अाहे. जेणेकरून गाेदावरीचे रुपडे पालटेल नाशिककरांसाठी महत्त्वाचे पर्यटनस्थळही विकसित हाेऊ शकेल. त्यासाठीही विकास अाराखड्यात काही बदल करण्याचे काम सुरू अाहे. पुढे लक्ष्मीनारायण घाटाजवळ इव्हेंट ग्राउंडही केले जाणार असून, त्यासाठी १० एकर जागेचा विचार सुरू अाहे. पुढे टाकळी संगम येथेही मधाेमध असलेल्या जागेवर नियाेजनबद्ध प्रकल्प राबवला जाणार अाहे.

गाेदावरी नदीपात्रात काँॅक्रिटीकरण करू नये, या ‘निरी’च्या शिफारशीला पालिकेने सहमती दर्शवली अाहे. काँक्रिटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरण्यास भूगर्भातील पाणी वर येण्यास अडचणी निर्माण हाेत असल्याचेही मान्य करण्यात अाले. त्यामुळे अाता गेल्या अनेक दिवसांपासून रामकुंडातील काँक्रिटीकरणाबाबत काय निर्णय घ्यायचा, असाही पेच निर्माण हाेणार अाहे. दुसरीकडे, नदीच्या दाेन्ही किनाऱ्यालगत १८ मीटर जागेवरील नवीन बांधकामांना मज्जाव करण्यात अाला अाहे. मात्र, जुन्या बांधकामांना संरक्षणही देण्याबाबत एकमत झाल्याचे अायुक्तांनी सांगितले. मात्र, या निर्णयामुळे नदी किनाऱ्यावरील सध्याच्या पडीक जागेवर अतिक्रमण हाेण्याची शक्यता लक्षात घेता येथे नदी संवर्धनाला पूरक अशी उद्याने छाेटी बांधकामेही हाेणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...