आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमधील १०० पर्यटक काठमांडूत सुखरूप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काठमांडूत असलेले जिल्ह्यातील किमान शंभर पर्यटक सुखरूप असल्याची माहिती ट्रॅव्हल कंपन्यांच्या मालकांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. दरम्यान, बद्रिनाथचा कपाट उघडण्याचा साेहळा रविवारी पहाटे हाेत अाहे. येथे पर्यटकांची संख्या वाढली असून, भूकंपाचा येथे काहीही परिणाम जाणवला नाही. जिल्हा प्रशासनानेही तहसीलदारांना काठमांडूला यात्रेला गेलेल्यांची माहिती संकलित करण्याचे अादेश दिले अाहेत. दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, पर्यटकांच्या अाप्तांना थेट या कक्षाशी संपर्क साधण्याचे अावाहन करण्यात आले अाहे. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप भारतात अाणण्याला प्राथमिकता दिली जात असून, राज्यातील पर्यटकांना नेपाळमध्ये जाऊ देऊ नये, तसेच यात्रा स्थगित कराव्यात, असे निर्देश थेट मुख्यमंत्र्यांनी दिले अाहेत.

काठमांडूला गेलेल्या शंभर पर्यटकांपैकी पन्नास जणांनी नेपाळ साेडले असून, उर्वरित काठमांडूतच अाहेत. विशेष म्हणजे बीएसएनएलवरून नेपाळमध्ये दिवस लाेकल काॅलच्या दरात फाेन करण्याची सुविधा शासनाने दिली अाहे.

विमानतळावर दहा पर्यटक
निफाड,चांदवड, मालेगाव येथील दहा पर्यटक नेपाळला अाहेत. काठमांडू विमानतळावर ते सुखरूप असून, त्यांना रविवारी सकाळी बसद्वारे वाराणसीला अाणले जाईल. त्यानंतर रेल्वेने मनमाडला अाणले जाणार अाहे. हरीशगाेगड, संचालक,कीर्ती टूर्स

सिमेन्स कंपनीचे २६ जण सुखरूप
काठमांडूतअडकलेल्या पर्यटकांत नाशिकमधील सिमेन्स कंपनीचे २६ कर्मचारी असल्याचे वृत्त अाहे. ते पर्यटनासाठी गेले हाेते ते सुखरूप असल्याचे सांगितले जात अाहे.

दूरच्या धक्क्याची नाेंद
भूकंपझाला की, नाशिककरांना दळवटची अाठवण हाेते. मात्र, नेपाळमधील भूकंपाची नाेंद नाशकातील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशाेधन संस्थेच्या भूकंपमापन केंद्रावर दूरचा धक्का म्हणून नाेंदली गेली.

बद्रिनाथमध्ये भूकंपाचा परिणाम नाही
बद्रिनाथमंदिराचा कपाट उघडण्याचा साेहळा रविवारी असून, याकरिता हजाराे भाविक येथे पाेहाेचले अाहेत. भूकंपाचा कुठलाच परिणाम येथे झालेला नसून, राज्याचे मुख्यमंत्री काही मंत्र्यांसमवेत येथे अाहेत. -स्वामी संविदानंद सरस्वती, प्रमुख,कैलास मठ

नागरिकांनी माहिती कळवावी
तहसीलदारांनायात्रेकरूंची माहिती जमा करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय यात्रा कंपन्यांकडूनही माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत तेथे अडकलेल्यांची निश्चित माहिती उपलब्ध झाली नाही.- जितेंद्रकाकुस्ते, निवासी उपजिल्हाधिकारी

या क्रमांकावर करा संपर्क
नातेवाईकांचीमाहिती महाराष्ट्र सदन सेल्सला देण्यासाठी ९१-९९६८०९५१६९ या क्रमांकवर संपर्क करावा. तसेच जिल्हा प्रशासनाच्या ०२५३-२३१७१५१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

पर्यटक सुखरूप
अामचेशंभर पर्यटक नेपाळमध्ये हाेते. भूकंपावेळी पन्नास जण पशुपतिनाथ मंदिराच्या परिसरात हाेते. इतर पन्नास भारतात परतले असून, तेही सुरक्षित अाहेत. ब्रिजमाेहनचाैधरी, संचालक,चाैधरी यात्रा कंपनी