आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्वण्या निर्विघ्न हाेण्यासाठी ११ बाॅम्बशाेधक पथके अत्याधुनिक शस्त्रांसह सज्ज,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुंभमेळ्यात नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या तीनही पर्वणींना देशभरातून किमान ७५ लाखांच्या संख्येने भाविक दाखल हाेणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज अाहे. एवढा माेठा जनसागर उसळणार असल्याने दहशतवादी हल्ल्यासारख्या कारवाया राेखण्यासाठी बाॅम्बशाेधक व नाशकची (बीडीडीएस) ११ पथके अत्याधुनिक शस्त्रांसह सज्ज अाहेत. दुसरीकडे, वर्षभरापूर्वी सिंहस्थासाठी विशेष मंजूर केलेला एक काेटी किमतीचा राेबाे पर्वणी चाैदा दिवसांवर येऊन ठेपली असतानाही अद्याप उपलब्ध नाही. परिणामी यंत्रणेला जुन्याच राेबाेवर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता आहे.पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला अाहे.
कुंभमेळ्यावरही हल्ल्याचे सावट असल्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी नाशिक दौऱ्यात मान्य केले होते. तेव्हापासून पोलिस बंदोबस्ताची रंगीत तालीम सुरू आहे. त्याअंतर्गत नऊ बीडीडीएस पथके शहरात दाखल झाली आहेत. नाशिक पोलिसांची दोन पथके तसेच इतर अकरा पथके धार्मिक स्थळे, बसस्थानक, रेल्वेस्थानक, साधुग्राम, तपोवन, रामकुंड तसेच गर्दीच्या ठिकाणी तपासणी करत आहेत. या पथकांत १०० प्रशिक्षित कर्मचारी असून त्यांच्या मदतीसाठी प्रशिक्षित ११ श्वानही अाहेत. नाकेबंदी करून श्वानपथकाकडून परराज्यांतून येणाऱ्या खासगी बस, ट्रॅव्हल्सची कसून तपासणी सुरू आहे. कुठल्याही संकटावर मात करण्यासाठी बाॅम्बसूट, राेबाे व इतर साहित्य असल्याने यंत्रणा सक्षम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पथकांत १०० प्रशिक्षित कर्मचारी, मदतीसाठी ११ श्वानही तैनात
राज्यभरातून अाली पथके
पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नवी मुंबई, वसई, विरार, वाशी, हिंगोली, जालना अशी एकूण नऊ व नाशिक पोलिसांची दाेन पथके नाशिकमध्ये बंदाेबस्तावर अाहेत. या ११ पथकांतील १०० कर्मचारी आणि ११ श्वान सिंहस्थ काळात स्फाेटक वस्तूंचा मागाेवा घेतील.

११बॉम्बशोधक श्वान शहरात दाखल.

२००मीटर अंतरावरील बाॅम्ब निकामी करण्याची राेबाेची क्षमता.

१०० कर्मचारी असतील तैनात केलेल्या बॉम्बशोधक पथकात.

जुन्या रोबोवरच भिस्त
बीडीडीएस पथकात नवीन रोबो दाखल होणार होते. पण तांत्रिक अडचणीमुळे नवीन रोबो खरेदी रखडली. नवीन रोबोची एक ते सव्वा किमी अंतरावरील बॉम्ब नष्ट (डिस्पोज) करण्याची क्षमता होती, तर जुन्या रोबोची क्षमता केवळ २०० ते ३०० मीटर एवढीच आहे.

आठ दिवस बजावणार कर्तव्य
राज्यातील पथक पर्वणीच्या चार दिवस आधी आणि नंतर चार दिवस असे आठ दिवस कर्तव्य बजावतील. गर्दीच्या काळात सर्वाधिक अाव्हानात्मक जबाबदारी या पथकांवर असेल. शहरातील तसेच शहराबाहेरील लॉज आणि हॉटेल्सची पथकांकडून दैनंदिन तपासणी सुरू आहे.