आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दाेन महिलांच्या बळीप्रकरणी 11 आरोपींना आजन्म कारावास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकमधील घोटी पोलिसांनी याप्रकरणात 11 जणांना अटक केली होती. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
नाशिकमधील घोटी पोलिसांनी याप्रकरणात 11 जणांना अटक केली होती. (संग्रहित फोटो)

नाशिक- अंगात भूत असल्याच्या संशयातून दोन महिलांच्या अंगावर नाचत त्यांना जिवे मारणाऱ्या ११ जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांनी मंगळवारी अाजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.  अाराेपींमध्ये तीन महिलांचा समावेश अाहे.   


त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष गावातील राहीबाई पिंगळे यांनी  ३० डिसेंबर २०१४ ला या प्रकरणी पाेलिसांत फिर्याद दिली हाेती. गावातील ११ लोकांनी भूत असल्याचा संशयाने तिची आई बुधीबाई, काशीबाई यांना वेताच्या काठीने बेदम मारहाण केली हाेती. तसेच  दोघींच्या अंगावर नाचून त्यांना खड्ड्यात पुरले हाेते.  विशेष म्हणजे आरोपींनी स्वत:च्या अंगावरील कपडेही या खड्ड्यात पुरले हाेते. त्या वेळी राहीबाई जीव वाचवून पळाल्या होत्या. दोन महिन्यांनी या प्रकरणाची गावात चर्चा होऊ लागली. सामाजिक कार्यकर्ते  भगवान मधे यांनी राहीबाई यांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांनी पाेलिसांत तक्रार देण्याचे धाडस केले.   


दंडाची रक्कम फिर्यादी महिलेला

याप्रकरणी  संशयित बच्चीबाई नारायण खडके (४२), बुधीबाई महादू वीर (३५), लक्ष्मण बुधा निरगुडे ( ३०), नारायण शिवा खडके, (४२), वामन हनुमंता निरगुडे (३९), गोविंद पुनाजी दोरे (२८), काशिनाथ पुनाजी दोरे ( ३१), महादू कृष्णा वीर (४०), हरी बुधा निरगुडे (३०), सनीबाई बुधा निरगुडे (६५) यांच्याविरोधात खून व जादूटाेणाविराेधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला हाेता. हे सर्व अाराेपी सध्या नाशिकच्या कारागृहात अाहेत.  या खटल्यात फाॅरेन्सिक तज्ज्ञ डॉ. आनंद पवार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन महिन्यांनंतर पुरलेले मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यात दाेन्ही महिलांचा छातीची हाडे मोडून मृत्यू झाल्याचा अहवाल डॉ. पवार यांनी दिला होता. त्यावरून अाराेपींना आजन्म कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच अाराेपींकडून वसूल हाेणारी एक लाख रुपये दंडाची रक्कम या नरबळी प्रकरणात  वाचलेल्या मुख्य फिर्यादी महिलेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले अाहेत.

 

जन्मदात्या आईसह सासू आणि तांत्रिक महिलेचा बळी

घरातील वृद्ध महिलांमुळेच सुख समाधान मिळत नाही, पैसा टिकत नाही, असा समज मांत्रिकाच्या नादी लागलेल्या काशीनाथ आणि गोविंद दोरे या भावांचा करुन देण्यात आला. त्यातूनच त्यांनी जन्मदात्या आईसह सासू आणि तांत्रिक महिलेचा बळी दिला.

 

असा वाचला बहिणीचा जीव

बळी देण्याआधी त्यांनी आईच्या विवस्त्र शरीरावर नाचून तिचे हाल केले व तिचे डोळेही फोडले. मांत्रिक महिलेच्या सासूलाही अशाचप्रकारे हाल करुन जीवे मारण्यात आले. हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांच्या बहिणीने विवस्त्र अवस्थेतच पळ काढला आणि आपला जीव वाचवला होता. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...