आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ११ लाखांचा ‘निवास’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक रोड - रेल्वे स्थानकावरील सुविधांचे प्रस्ताव आर्थिक टंचाईमुळे नाकारणाऱ्या रेल्वे प्रशासनाने कुंभमेळ्यासाठी परराज्यातून आलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी खासगी गेस्ट हाऊसवर अकरा लाखांची नविास व्यवस्था केली आहे. नविासाची व्यवस्था करताना कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. नाशिक त्र्यंबकेश्वरला भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील मर्यादित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढणार आहे, तसेच रेल्वेने भाविकांच्या सुविधेसाठी अतिरिक्त तिकिट, आरक्षण केंद्र सुरू केले आहे.

वैद्यकीय पथकांसह तिकीट तपासणीस, इंजिनिअरिंग, गाडीची देखभाल दुरुस्तींसह वेगवेगळ्या विभागांचे सुमारे २१७ अतिरिक्त कर्मचाऱ्यांची सप्टेंबर अखेरपर्यंत स्थानकावर अतिरिक्त कामासाठी नियुक्ती केली आहे.कुंभमेळा ध्वजारोहणाच्या दविसापासून अतिरिक्त कर्मचारी स्थानकावर कार्यरत झाले आहेत.सुरुवातीला कर्मचाऱ्यांची ट्रॅक्शन मशीन कारखान्याच्या ठिकाणी नविासाची व्यवस्था केली, मात्र जाण्या-येण्यासाठी कर्मचाऱ्यांचा दररोज शंभर ते दोनशे रुपये खर्च होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनाने देवळाली कॅम्प रस्त्यावरील एका खासगी गेस्ट हाऊसमध्ये अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नविासाची व्यवस्था केली. यासाठी रेल्वेला तीन महिन्यांसाठी अकरा लाख रुपये खर्च येणार आहे.
एकीकडे २१७ कर्मचाऱ्यांसाठी नविासासाठी खासगी गेस्ट हाऊसमध्ये नविास व्यवस्था, तर दुसरीकडे प्रशासनाने व्यवस्था केल्याने नविासाची सोय नसल्याने काही कर्मचाऱ्यांना स्थानकावर टेन्टमध्ये रहावे लागत असल्याने प्रशासन कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.