आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 11 Lakhs Bribe: Nashik Divisional Additional Registra Arrest

11 लाखांची लाच; नाशिक विभागाचे सहनिबंधक अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जिल्हा बँकेच्या तीन संचालकांचे पद रद्दबातल न करण्यासाठी 11 लाखाची लाच घेताना विभागीय सहनिबंधक गौतम भालेराव यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रात्री अटक केली.

बॅँकेचे अध्यक्ष अद्वय हिरे यांच्याकडून प्लास्टिकच्या पिशवीतून रक्कम स्वीकारतानाच भालेराव जाळ्यात अडकले. नाशिक जिल्हा बॅँकेचे संचालक प्रशांत हिरे, यशवंत भोये, देवीदास पिंगळे यांचे संचालक पद रद्द करण्याची नोटीस देण्यात आली होती. 25 रोजी म्हणणे मांडण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले होते. पद रद्द करू नये, यासाठी सहा लाख आणि यापूर्वी दिलेल्या अध्यक्षपदाच्या मुदतवाढीच्या शिफारशीचे पाच लाख रुपये भालेराव यांनी मागितले. अद्वय यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.