आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 11 Special, Few New Trains For Simhasth Kumbhamela

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंहस्थासाठी ११ विशेष, तर काही नवीन रेल्वे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - सिंहस्थकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने नियोजनाचा प्राथमिक अहवाल शुक्रवारी जिल्हा प्रशासनास सादर केला. दरम्यान, कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणा-या भाविकांच्या सोयीसाठी अकरा विशेष काही नवीन गाड्या साेडणार असल्याची माहिती रेल्वेने दिली. नवीन नियोजित गाड्या कुठे थांबतील त्या कशा सोडण्यात येतील, तसेच कुठे मुक्कामी असतील याची प्राथमिक माहिती यावेळी दिली गेली. जिल्हा प्रशासनाने गाड्यांसह अतिरिक्त बोग्या नाशिकरोड, देवळाली कॅम्प, आेढा येथे मुक्कामी ठेवण्याबाबत सुचविले.
कुंभमेळ्याशी संबधित केंद्र, राज्य शासनाच्या सर्व विभागांनी वेळेत विकासकामांचा आराखडा सादर केला. मात्र, वारंवार सूचना देऊनही रेल्वेने आराखडा सादर केला नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्हास्तरीय बैठकीत रेल्वेच्या नियोजनाबाबत शंका उपस्थित केल्या गेल्या. शुक्रवारी रेल्वे स्थानकाच्या पाहणी दौ-यादरम्यान रेल्वेने नियोजनाचा प्राथमिक अहवाल सादर केला.

सिंहस्थात येणा-या प्रवाशांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूकडील दहा एकर जागेत उभारण्यात येणा-या प्रवासी शेडचा प्रस्ताव रेल्वेने साफ फेटाळून लावला. देशभरातील प्रवाशांसाठी निवारा शेड, राहण्याची व्यवस्था हा विषय महापालिकेचा हाेता. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव भुसावळ मंडल प्रबंधकांनी काल प्रस्तावास नकार दिला. काल सकाळी विभागीय आयुक्तालयात आजूबाजूच्या जिल्ह्यांतील नाशिकला जाेडणा-या रस्त्यांवरील वाहतूक नियाेजनाबाबत व्हीडीआे काॅन्फरसिंगद्वारे बैठक झाली. तसेच रेल्वे स्थानकावरून प्रवाशांना जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली.

पथकाकडून पाहणी
रेल्वेस्थानकावरील विविध विकासकामांची भुसावळ रेल्वे मंडल प्रबंधक महेशकुमार गुप्ता तसेच विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्यासह स्थानिक वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांनी संयुक्त पाहणी केली. यावेळी भुसावळ मंडल प्रबंधक महेशकुमार गुप्ता, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक एन. जी. बाेरीकर, वरिष्ठ अधिकारी पवन पाटील, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी विलास पाटील, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, रेल्वे सुरक्षा दलाचे मिश्रा, पाेलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, कुंभमेळा अधिकारी महेश पाटील यांनी पाहणी केली.