आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीची पहिली कट ऑफ ९४ टक्क्यांवर शक्य, प्रवेशासाठीची गुणवत्ता यादी गाठणार उच्चांक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा या शाखांसाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत २० हजार जागा उपलब्ध असून, त्यासाठी तब्बल ३५ ते ४० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रवेशासाठीच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत दुप्पट विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून, सर्वाधिक अर्ज हे विज्ञान वाणिज्य शाखेसाठी आले आहे. त्यातच या वर्षी दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असल्याने अकरावी प्रवेशासाठीची गुणवत्ता यादी उच्चांक गाठणार असल्याची शक्यता आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत विज्ञान शाखेसाठी ९४ टक्के तर वाणिज्यसाठी कट ऑफही ९० टक्क्यांच्या पुढे राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष गुणवत्ता यादीकडे लागून राहिले असून, प्रवेशासाठी मोठी कसरत करावी लागू शकते.
अकरावीसाठी तब्बल ३५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज (मेरिट फॉर्म) दाखल झाले आहेत. अकरावीचे शहरात ५० हून अधिक महाविद्यालये असून, त्यात प्रवेशासाठी २० ते २१ हजार जागा उपलब्ध आहेत. प्रवेशाच्या जागांपेक्षा विद्यार्थ्यांचे अर्ज जास्त संख्येने प्राप्त झाल्याने पहिल्या गुणवत्ता यादीचा उच्चांक राहण्याची शक्यता आहे. अकरावीची पहिली गुणवत्ता यादी २२ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

२५ जूनपर्यंत गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया होईल. त्यानंतर २७ २८ रोजी दुसरी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल. तर २९ जून रोजी चौथी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, या वेळापत्रकानुसार प्रवेशप्रक्रिया पार पडणार आहे.

विज्ञानसाठीतब्बल २५ हजारांवर अर्ज : अकरावीच्याविज्ञान शाखेकडे सर्वाधिक विद्यार्थ्यांचा ओढा असून, शहरातील प्रमुख महाविद्यालयांत तब्बल २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहे. तर वाणिज्य शाखेसाठी १० हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहे. त्यामुळे विज्ञानपाठोपाठ वाणिज्य शाखेचा कट ऑफही यंदा उच्चांक गाठू शकेल.

मेरिट फॉर्ममध्ये दुरुस्तीची आज संधी
अकरावीचे मेरिट फॉर्म भरताना चुकीची माहिती सादर झाली असल्यास तसेच अर्जांमध्ये दुरुस्ती करावयाची असल्याने मविप्रतर्फे विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे. सोमवारी (दि. २०) सकाळी १० ते या वेळेत अर्जांमध्ये दुरुस्ती करता येईल. www.online.mvp.edu.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी पालकांना दुरुस्तीची संधी असेल, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे.

दहावीतील ७३ टक्के विद्यार्थी गुणवत्तेत
दहावीच्या या वर्षीच्या निकालामध्ये विशेष प्रावीण्य प्रथम श्रेणी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून, ७३ टक्के विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत स्थान मिळवले आहे. त्यात विशेष प्रावीण्यात ५३ हजार ४३४ विद्यार्थी तर ७८ हजार २०३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक असल्याने अकरावीच्या गुणवत्ता यादीचा कट ऑफ वाढेल, असा अंदाज आहे.
बातम्या आणखी आहेत...