आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेश: मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेशाच्या सक्तीबाबत विद्यार्थी संघटनांची हतबलता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पालक ऐनवेळी कचखाऊ धोरण अवलंबत असल्यामुळे मॅनेजमेंट कोट्याच्या दुकानदारीविरोधात आम्हाला ठोस आवाज उठवता येत नाही, असे सांगत शहरातील विद्यार्थी संघटनांनी हतबलता व्यक्त केली आहे. मॅनेजमेंट कोट्याच्या नावाने चालणार्‍या गैरकारभाराविरोधात विद्यार्थी वा पालकांनी तक्रार केल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही या संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिला.

नियमित प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली नसतानाही काही महाविद्यालयांमध्ये या मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. साधारणत: दहा हजारांपासून 20 हजारांपर्यंत शुल्क आकारणी या विद्यार्थ्यांकडून केली जात असल्याचे विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. डोनेशन घेतले जात नाही, असा दावा जरी महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाकडून केला जात असला तरी इमारत निधीच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोपही संघटनांकडून केला जात आहे.
'
डोनेशन उकळले जाते

4महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंट कोट्याच्या नावाखाली डोनेशन उकळले जात आहे, ही बाब खरी आहे; परंतु तक्रारींसाठी पालकच पुढे येत नसल्यामुळे कुठल्या आधारावर आम्ही आंदोलन करावे, असा प्रश्न पडतो. शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेच्या वतीने या वर्षी आतापर्यंत सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची तक्रार असल्यास त्यांनी आमच्याशी 9860708568 या क्रमांकावर संपर्क साधावा. योगेश बेलदार, जिल्हाप्रमुख, विद्यार्थी सेना

भरारी पथक नेमावे

4मॅनेजमेंट कोट्याचा आडोसा घेऊन अव्वाच्या सव्वा शुल्क घेऊन प्रवेश देण्याचा उद्योग काही महाविद्यालयांमध्ये सुरू आहे; परंतु त्याची तक्रार मात्र कोणी करताना दिसत नाही. आपल्या पाल्याला भविष्यात त्रास होऊ नये म्हणून पालक आमच्याकडे येण्यास टाळतात. या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक कार्यालयानेच भरारी पथकाची नेमणूक करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी 9922266799 या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधावा. खंडेराव मेढे, प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना