आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक: अकरावी प्रवेशाची मुदत 7 ऑगस्टपर्यंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दोन महिन्यांपासून सुरू असलेली अकरावीची प्रवेशप्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, 7 ऑगस्ट ही प्रवेशाची अंतिम मुदत आहे. मात्र, विशेष परवानगीने त्यानंतरही अकरावीत प्रवेश घेण्यात येणार असल्याने ज्या विद्यार्थ्यांचे अद्याप प्रवेश झाले नसतील, अशांना दिलासा मिळाला आहे.

15 जूनपासून अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू असून, त्यात प्रथम गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात आले. मात्र, बहुतांशी विद्यार्थ्यांनी एकाच वेळी अनेक महाविद्यालयांत गुणवत्ता अर्ज भरल्याने काही महाविद्यालयांतील जागा रिक्तच राहिल्या. त्या ठिकाणी पुढील अर्जांनुसार गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश देण्यात आले. त्याचबरोबर महाविद्यालय व्यवस्थापनाकडील 12 टक्के प्रवेशाच्या हक्कानुसार त्यांच्यामार्फतही प्रवेश देणे सुरूच आहे. विशेष म्हणजे, अकरावीच्या प्रथम सत्रापर्यंतही प्रवेश देण्याची तरतूद आहे.

अठरा हजार प्रवेश पूर्ण : अकरावीच्या 18680 जागांपैकी 18001 प्रवेश पूर्ण झाले. मात्र, अद्यापही 679 जागा रिक्त आहेत. यात कला शाखेत आत्तापर्यंत 3982 प्रवेश झाले असून, 498 जागा रिक्त आहेत. वाणिज्य शाखेच्याही एकूण जागांपैकी 471 जागा रिक्त आहेत. विज्ञान शाखेत एकूण 7165 प्रवेश झाले. यात 325 जागांचे जादा प्रवेश झाले आहेत.