आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीच्या जागा २० हजार, विद्यार्थ्यांचे अर्ज ३५ हजारांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा या अभ्यासक्रमांसाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत तब्बल ३५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज (मेरिट फॉर्म) दाखल झाले आहेत. अकरावीचे शहरात ५० हून अधिक महाविद्यालये असून, त्यात प्रवेशासाठी २० ते २१ हजार जागा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठीच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत १५ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज जास्त संख्येने प्राप्त झाल्याने पहिली गुणवत्ता यादीचा उच्चांक ९० टक्क्यांच्या पुढे राहणार असल्याची शक्यता आहे.
अकरावीसाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू असून, शनिवारपर्यंत मेरिट फॉर्म दाखल करण्याची विहित मुदत होती. शहरातील प्रमुख शिक्षण संस्थांमध्ये मागील वर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. अकरावीचे नाशिक जिल्ह्यात एकूण ३२८ कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यात तब्बल ६५ हजार २८० जागा आहेत. तर, मविप्र संस्थेची जिल्ह्यात ५४ कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यात १९ हजार ७३५ जागा आहेत. या सर्व महाविद्यालयांत अकरावी प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन राबविली जात आहे. शहरातील प्रमुख महाविद्यालयांत सर्वाधिक विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी ओढा असून, एकूण ३० ते ३५ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे. मेरिट फॉर्मची संख्या मोठी असल्याने पहिली गुणवत्ता यादी उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

मविप्रच्याकॉलेजांसाठी ३० हजार अर्ज : मविप्रसंचलित महाविद्यालयांत प्रवेशासाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे. संस्थेची जिल्हाभरातील ५४ महाविद्यालयांतील १९ हजार जागांसाठी तब्बल ३० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहे.

२२ जूनला पहिली गुणवत्ता यादी
अकरावीसाठी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी २२ जून रोजी जाहीर होणार आहे. २५ पर्यंत गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया होईल. त्यानंतर २७ २८ रोजी दुसरी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल. तर, २९ जून रोजी चौथी गुणवत्ता यादी जाहीर होईल.