आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी विज्ञानचा कट अाॅफ ९४ टक्के, प्रवेशासाठीपहिली गुणवत्ता यादी जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील प्रमुख महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत यंदा नवा उच्चांक गाठला गेला आहे. विज्ञान शाखेसाठी ९४ टक्क्यांवर पहिला कट ऑफ लागला असून, वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने या शाखेसाठीचा कट ऑफही ८७ टक्क्यांवर गेला आहे. कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा फारसा कल नसल्याने या शाखेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुलभ आहे.
कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा (एचएससी व्होकेशनल) या शाखांसाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्या २० ते २१ हजार जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी तब्बल ३५ ते ४० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज (मेरिट फॉर्म) प्राप्त झाले आहेत. अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी बुधवारी (दि. २२) दुपारी वाजता जाहीर झाली. उत्कंठा लागून राहिलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी पाहण्यासाठी महाविद्यालयांत मोठी गर्दी झाली होती. अकरावी प्रवेशासाठीच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत दुप्पट विद्यार्थ्यांचे अर्ज आले. सर्वाधिक अर्ज विज्ञान वाणिज्य शाखेसाठी आल्याने या दोन्ही शाखांच्या गुणवत्ता यादीने उच्चांक गाठला आहे.
विज्ञानसाठी सरासरी ९० ते ९४ टक्क्यांपर्यंत तर वाणिज्यसाठी ७५ ते ८७ टक्क्यांपर्यंत कट ऑफ लागला आहे. पहिल्या यादीत स्थान मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष आता दुसऱ्या गुणवत्ता यादीकडे लागले आहे.

अकरावीच्या जागा अशा
अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये माेठीच उत्कंठा हाेती. अपेक्षा, निराशा, समाधान, अाश्चर्य असे वेगवेगळे भाव त्यांच्या चेहऱ्यावर झळकत हाेते...

यामुळे वाढला कट अॉफ...
दहावीतयंदा विशेष प्रावीण्य प्रथम श्रेणी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक राहिली. तब्बल ७३ टक्के विद्यार्थ्यांनी ‘गुणवत्ते’त स्थान मिळवले आहे. त्यात विशेष प्रावीण्यात ५३ हजार ४३४ विद्यार्थी, तर ७८ हजार २०३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक असल्याने अकरावीच्या गुणवत्ता यादीचा कट ऑफ वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...