आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीसाठी ५०,९३३ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण, ३२८ महाविद्यालयांतील प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त विद्याशाखा अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, आतापर्यंत ८० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात एकूण ३२८ कनिष्ठ महाविद्यालयांत सर्व विद्याशाखांची मिळून ६५ हजार २८० जागांपैकी ५० हजार ९३३ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. तर, १४ ते १५ हजार एवढ्या प्रवेशाच्या जागा अजूनही भरलेल्या नाहीत. प्रवेशप्रक्रिया सुरू असून, तिसऱ्या चौथ्या यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू आहेत. तसेच, संस्थात्मक स्तरावरील जागांवरही प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शहरात अकरावीचे ५० हून अधिक महाविद्यालये असून, त्यात २० ते २१ हजार जागा उपलब्ध आहेत. त्यातील १५ ते १६ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत, तर जिल्हाभरातील ३२८ कनिष्ठ महाविद्यालयांत एकूण ५० हजार ९३३ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. पहिल्या तिन्ही याद्यांतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता चौथ्या यादीतील तसेच संस्थात्मक स्तरावरील प्रवेश दिले जात आहेत. शहरातील काही महाविद्यालयांचा अपवाद वगळता इतर
महाविद्यालयांत प्रवेशाच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयांत संधी आहे.

..तर वाढीव जागांना मिळणार मान्यता
^अकरावीची प्रवेशप्रक्रियासुरळीत पार पडली असून, आतापर्यंतच्या प्रवेशप्रक्रियेचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रवेशासाठी अजूनही १५ ते १६ हजार जागा उपलब्ध आहेत. तसेच, काही महाविद्यालयांकडून वाढीव जागांसाठी प्रस्ताव आले तर त्याचा विचार करून मान्यता देण्यात येईल. -नवनाथ आैताडे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद
बातम्या आणखी आहेत...