आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीचे प्रवेश उद्यापासून, महाविद्यालयांच्या संकेतस्थळांवर अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीची प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून (िद. १५) सुरू होणार आहे. शहरातील प्रमुख महाविद्यालयांत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया होणार असून, सोमवारी दुपारनंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन मेरिट फॉर्म भरता येणार आहेत. त्यासाठी त्या-त्या महाविद्यालयांच्या (संस्थेच्या) संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
शहरात अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम असलेली ५१ महाविद्यालये असून, २० हजार ८६० जागा आहेत. प्रवेश अर्ज वितरण जमा करण्याची प्रक्रिया १८ जूनपर्यंत चालेल, तर संवर्गनिहाय गुणवत्ता यादी, प्रतीक्षा यादी २२ जूनला जाहीर होईल. त्यानंतर २५ जूनपर्यंत गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
मविप्रची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया
मविप्रच्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन होणार असून, संस्थेच्या www.mvp.edu.in या संकेतस्थळावर १५ जून राेजी दुपारी ते १८ जून राेजी सायंकाळी वाजेपर्यंत मेरिट फॉर्म भरण्यासाठी अर्ज उपलब्ध राहतील. २२ जूनला ऑनलाइन गुणवत्ता यादी जाहीर होईल. २३ ते २५ जूनपर्यंत गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल.