नाशिक - ऑनलाइन निकालानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना बुधवारी (दि. १५) शाळांमधून गुणपत्रके मिळाली असून, अाता त्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज करता येणार आहेत. प्रमुख शिक्षण संस्थांमध्ये मागील वर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, ऑनलाइन नोंदणी मेरिट फॉर्म भरण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशाबाबतचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले असून, विद्यार्थ्यांना १८ जूनपर्यंत अर्ज भरावे लागणार आहेत.
दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जूनला जाहीर झाला. अकरावी प्रवेशासाठी काही संस्थांच्या महाविद्यालयांत मेरिट फॉर्म ऑनलाइन भरून घेतले जाणार असून, प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया मात्र ऑनलाइन स्वरूपात नसेल. तर काही महाविद्यालयांत प्रवेशप्रक्रियाही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. शहरात कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा असलेली ५० हून अधिक महाविद्यालये असून, त्यात २० हजारांवर जागा उपलब्ध आहेत. तर जिल्ह्यात एकूण ३२८ कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यात तब्बल ६५ हजार २८० जागा आहेत.
मविप्रच्याकॉलेजांसाठी दोन हजार अर्ज : मराठाविद्या प्रसारक समाज संस्थेची जिल्ह्यात संस्थेची ५४ कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यात १९ हजार ७३५ जागा आहेत. या सर्व महाविद्यालयांत अकरावी प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन होणार असून, विद्यार्थ्यांना मेरिट फॉर्म भरण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली अाहे. बुधवारी पहिल्याच दिवशी सायंकाळपर्यंत दोन हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले.
प्रमुख कॉलेजांची संकेतस्थळे
{मविप्रची सर्व कनिष्ठ महाविद्यालये : www.online.mvp.edu.in
{ पंचवटी कॉलेज : www.lvhcollege.com/?id=Admission
{ एचपीटी-आरवायके कॉलेज : www. gesfyjc.somee.com/Colleges.aspx
{ भोंसला कॉलेज : www.bmc.vriddhiedubrain.com, www.bmc.bhonsala.in
अशी होईल प्रवेशप्रक्रिया
१५ ते १८ जून : प्रवेशअर्ज वितरण जमा
२२ जून : अर्जांचीछाननी पहिली गुणवत्ता यादी
२५ जून : गुणवत्तायादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश
२७ जून : दुसरीप्रवेश यादी
२८ जून : दुसऱ्यायादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश
२८ जून : तिसरीप्रवेश यादी
२९ जून : विद्यार्थ्यांनाप्रवेश
२९ जून : चौथीयादी
३० जून : विद्यार्थ्यांनाप्रवेश देणे शिल्लक जागांवर गुणानुक्रमानुसार प्रवेश