आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकरावीसाठी पहिल्याच दिवशी १३ हजार प्रवेश अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अकरावीसाठी शहरातील सर्वच महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना गुणपत्रक मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी १३ हजार ५९७ विद्यार्थ्यांनी प्रमुख महाविद्यालयात मेरिट फॉर्म दाखल केले. मात्र, सर्व्हर डाऊन होत असल्याने विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अडचणी येत होत्या. सायंकाळनंतर संकेतस्थळ सुरळीत झाल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज केले. कला, वाणिज्य विज्ञान शाखांसाठी जिल्ह्यात आतापर्यंत २० हजारांवर अर्ज दाखल झाले असून, त्यात विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक दहा हजार, तर वाणिज्यसाठी पाच हजार अर्ज दाखल झाले. विद्यार्थ्यांना १८ जूनपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार आहे.
प्रमुख शिक्षण संस्थांमध्ये मागील वर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, ऑनलाइन नोंदणी मेरिट फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना १८ जूनपर्यंत प्रवेश अर्ज भरावे लागणार आहेत. २२ जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा असलेली शहरात ५० हून अधिक महाविद्यालये असून, त्यात २० हजारावर जागा उपलब्ध आहेत. तर जिल्ह्यात एकूण ३२८ कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यात तब्बल ६५ हजार २८० जागा आहेत.

मविप्रच्या कॉलेजांसाठी १७ हजार २६१ अर्ज : मराठाविद्या प्रसारक समाज संस्थेच्या जिल्ह्यातील ५४ कनिष्ठ महाविद्यालयांत १९ हजार ७३५ जागा आहेत. या सर्व महाविद्यालयांत अकरावी प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन राबविली जात असून त्यात पहिल्याच दिवशी तब्बल १७ हजार २६१ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. विज्ञानसाठी नऊ हजार, वाणिज्यसाठी पाच हजार ६४८ तर कला शाखेसाठी दोन हजार ४६४ अर्ज प्राप्त झाले आहेत. एमसीव्हीसीसाठी १४१ अर्ज आले आहेत. विद्यार्थ्यांना मेरिट फॉर्म भरण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध आहेत.

२२ जूनला पहिली गुणवत्ता यादी
अकरावीसाठी प्रवेश अर्ज वितरित करणे जमा करण्यासाठी १८ जूनपर्यंत मुदत आहे. तर, पहिली गुणवत्ता यादी २२ जून रोजी जाहीर होणार आहे. २५ पर्यंत विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया होईल. त्यानंतर २७ २८ रोजी दुसरी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल. तर, २९ जून रोजी चौथी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...