आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी वर्षात अकरावी प्रवेश अॉनलाइन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आगामी शैक्षणिक वर्षात (२०१७ -२०१८) अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून, त्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रयत्न सुरू झाले आहेत. ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी पालकांकडून केली जात होती. राज्य शासनाच्या निर्णयानुसार ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असून, त्यासाठी आवश्यक ते नियोजन केले जात आहे.

अकरावीची प्रवेशप्रक्रिया आता यापुढे ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना या प्रवेशप्रक्रियेबाबत माहिती व्हावी, या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे नाशिकरोड येथील बिटको कॉलेजमध्ये नुकतीच सहविचार सभा झाली. या सभेत शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, सहाय्यक संचालक दिलीप गोविंद यांनी ऑनलाइन प्रवेशाबाबत शासनाच्या निर्णयांची ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेमुळे होणारे फायदे याची माहिती यावेळी जाधव यांनी दिली. यावेळी एमकेसीएलचे संदीप चिपळूणकर यांनी संगणकाच्या सहाय्याने ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे सादरीकरण केले.

पुढील शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेबाबत माहिती दिली जात अाहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीनेच होतील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी सुरू करावी, अशा सूचनाही यावेळी उपसंचालक जाधव यांनी केल्या. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ अौताडे, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, व्ही. एम. सरोदे, ए. एम. बागुल, के. डी. मोरे आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...